World Cup Qualifying : एम्बापेची चूक फ्रान्सच्या विजयाआड आली नाही

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

वर्ल्ड कप पात्रता फेरीतील ड गटात फ्रान्ससह पाच देशांचा समावेश आहे. फ्रान्सने युक्रेनसोबत पहिला सामना खेळला होता.

फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीत रविवारी कझाकिस्तानला 2-0 ने नमवत पहिल्या विजयाची नोंद केली. फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बापे याने दुसऱ्या हाफमध्ये पेनल्टीवर गोल करण्याची संधी दवडली. त्याच्या या चुकीचा सामन्यावर कोणताही परिणाम झाला नाही. गतविजेचा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या फ्रान्सने पात्रता फेरीत आपल्या गटातील पहिला सामना युक्रेन विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यांनी 1-1 बरोबरी साधली होती. 

रविवारी रंगलेल्या सामन्यात ओसमाने डेम्बेले याने 19 व्या मिनिटाला फ्रान्सचे खाते उघडले.  त्यानंतर 44 व्या मिनिटात अ‍ॅन्टोनी ग्रीझमन आणि सर्गे मालेय यांच्यातील उत्तम ताळमेळाने फ्रान्सने दुसरा गोल नोंदवला. ग्रीझमन कॉर्नरवरुन मारलेल्या किकवर सर्गे मालेयने हेडरने गोल पोस्टचा वेध घेतला आणि फ्रान्सला 2-0 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. 

धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?

वर्ल्ड कप पात्रता फेरीतील ड गटात फ्रान्ससह पाच देशांचा समावेश आहे. फ्रान्सने युक्रेनसोबत पहिला सामना खेळला होता. दुसरीकडे कझाकिस्तानला पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.  या गटातील  बोस्निया अँण्ड हर्जेगोविना संघाने देखील एक सामना खेळला असून तो सामनाही अनिर्णित राहिला आहे. तर फिनलँडने खेळलेल्या दोन सामन्याचा निकालही लागलेला नाही. त्यामुळे पात्रता फेरीतील गटात पहिला सामना जिंकणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या