World Cup Qualifier : जर्मनीचा आईसलॅंडवर दणदणीत विजय

शैलेश नागवेकर
Saturday, 27 March 2021

माजी विजेत्या जर्मनीने आईसलॅंडवर वर्चस्व मिळवण्यासाठी पहिला गोल करण्याकरिता जराही वेळ दडवला नाही.

बर्लिन : लिऑन गोरेत्झका आणि काई हावेर्त्झ यांनी पाठोपाठ केलेल्या गोलांच्या जोरावर जर्मनीने विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत आईसलॅंडचा 3-0 असा पराभव केला. माजी विजेत्या जर्मनीने आईसलॅंडवर वर्चस्व मिळवण्यासाठी पहिला गोल करण्याकरिता जराही वेळ दडवला नाही. तिसऱ्याच मिनिटाला सेरगी गॅनब्रे आणि जोशुआ किमिच यांनी गोरेत्झकाकडे चेंडू दिला आणि त्याने अचुकपणे चेंडू गोलजाळ्यात मारला. चार मिनिटांनंतर हावेर्त्झने दूरवरून अचूक लक्ष्यभेद केला आणि जर्मनीने आईसलॅंडचा संघ सावरायच्या आतच दोन गोलांची आघाडी घेतली.

या दोन गोलांमुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या जर्मनीच्या गोरेत्झका आणि हावेर्त्झ यांना आणखी संधी मिळाल्या होत्या, पण या वेळी त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. पूर्वार्धात या सर्व घडामोडी घडत होत्या. 25 व्या मिनिटाला आईसलॅंडलाही संधी मिळाली होती, पण त्यांच्या रुना सिंगुर्जोसन्सने मारलेला अचूक फटका जर्मनीच्या डिफेंडर अँथोनिओ रुगीडरने दूर ढकलला. 

INDvsENG : रणनिती बदला नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल; मायकल वॉनचा टीम इंडियाला सल्ला

उत्तरार्धात जर्मनीने आपल्या खेळाची गती अधिक वाढवली. इकाय गुंडोगनने 20 मीटरवरून चेंडू थेट गोलजाळण्यात मारला आणि जर्मनीने 3-0 आघाडी घेतली. जर्मनीचे मार्गदर्शक जोशिम लोव यांनी 18 वर्षीय जमाल मुसियला याला अखेरच्या 12 मिनिटांच्या खेळात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी दिली. या विजयामुळे जर्मनी ‘ज’ गटात आघाडीवर आहे. या गटात आईसलॅंडसह रुमानिया, अर्मेनिया, नॉर्थ मॅसेडोनिया आणि लिचेटेन्सेटन यांचा समावेश आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या