चुकीनंतर केनची पुरेपूर भरपाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 July 2021

रशियातील २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेत हॅरी केन याने पेनल्टी किक दवडल्याने इंग्लंडचे आव्हान आटोपले होते. आता तीन वर्षांनी पुन्हा हॅरी केनची पेनल्टी किक रोखली गेली, पण त्याने वेगाने पुढे येत रिबाउंडवर गोल केला आणि इंग्लंडचा विजय साकारला.

लंडन - रशियातील २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेत हॅरी केन याने पेनल्टी किक दवडल्याने इंग्लंडचे आव्हान आटोपले होते. आता तीन वर्षांनी पुन्हा हॅरी केनची पेनल्टी किक रोखली गेली, पण त्याने वेगाने पुढे येत रिबाउंडवर गोल केला आणि इंग्लंडचा विजय साकारला. केनच्या या गोलमुळे इंग्लंडने युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला २-१ असे हरवत अंतिम फेरीत धडक मारली.

केनच्या या गोलने इंग्लंड चाहत्यांना यापूर्वीच्या अनेक निसटलेल्या विजयांमुळे झालेल्या जखमेवर मलम लावले गेले असल्याचीच भावना झाली. केनच्या या गोलनंतर इंग्लंड चाहते बेभान झाले. त्यात मार्गदर्शक गेरार्थ साउथगेट आघाडीवर होते. त्यांच्या हुकलेल्या पेनल्टीमुळे १९९६ च्या युरो स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंड पराजित झाले होते.

आम्ही चाहत्यांना आनंददायक क्षणाची भेट दिली आहे. हा जल्लोष अजून चार दिवस कायम राहील. ही स्पर्धा आमच्या अनेक चाहत्यांच्या स्मरणात राहणारी असेल, असे स्पर्धेपूर्वी सांगितले होते. तेच आमचा संघ घडवत आहे, असे साउथगेट यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या