FIFA World Cup qualification : ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर खाते उघडले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 April 2021

काही दिवसांपूर्वी सर्बियाविरुद्ध रोनाल्डोचा गोल नाकारण्यात आला होता; पण या वेळी त्याने कोणतीही शंका निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली.

पॅरीस : ख्रिस्तियानो रोनाल्डोने 2022 च्या विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील पहिला गोल केला आणि त्याच्या पोर्तुगाल संघाने लक्‍झेम्बर्गला 3-1 असे पराजित करीत पात्रतेच्या आशा कायम ठेवल्या. दरम्यान, बेल्जियमने बेलारुसविरुद्ध आठ गोल केले; पण त्यांनीही कतारमधील स्पर्धा संयोजनास विरोध केला. रोनाल्डोने त्याचा 103 वा आंतरराष्ट्रीय गोल उत्तरार्धातील पाचव्या मिनिटास केला आणि पोर्तुगालला धोकादायक लक्‍झेम्बर्गविरुद्ध गुण गमवावा लागणार नाही, याची खबरदारी घेतली.

काही दिवसांपूर्वी सर्बियाविरुद्ध रोनाल्डोचा गोल नाकारण्यात आला होता; पण या वेळी त्याने कोणतीही शंका निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. लक्‍झेम्बर्गने आयर्लंडला पराजित करून पात्रता स्पर्धेस जोरदार सुरुवात केली होती. त्यांनी पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यातील पहिला गोलही केला; पण पूर्वार्धातील भरपाई वेळेत पोर्तुगालने बरोबरी साधली आणि उत्तरार्धाच्या सुरुवातीस रोनाल्डोने गोल करीत अनपेक्षित निकाल लागणार नाही, याची खबरदारी घेतली. 

IPL 2021: एबी 'बायो-बबल'मध्ये तर कोहली क्वारंटाईन

दरम्यान, नेदरलॅंडस्‌ने जिब्राल्टरला 7-0 असे हरवत गटातील पिछाडी कमी केली. आघाडीवरील तुर्की आणि नेदरलॅंडस्‌मध्ये एका गुणाचा फरक आहे. डच संघांनी सात गोल केले असले, तरी त्यांचा खेळ उच्च दर्जाचा नव्हता. क्रोएशियाने गटात अव्वल येताना माल्टाला 3-0 असे हरवले. रशियाला स्लोवेकियाविरुद्ध 1-2 हार पत्करावी लागली. 

बेल्जियमचाही कतारला विरोध

स्थलांतरित मजूर विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या स्टेडियमच्या बांधकामावर आहेत. त्याचा निषेध करण्याची लाट युरोपात आली आहे. बेल्जियमने बेलारुसविरुद्धच्या सामन्याच्यावेळी हेच केले. यापूर्वी जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे आणि नेदरलॅंडस्‌ने हे केले आहे. बेल्जियम संघाने बदलास फुटबॉलचा पाठिंबा अशा अर्थाचे टीशर्ट परिधान केले होते. बेल्जियमने या लढतीत नवोदितांना जास्त संधी दिली; पण निकाल एकतर्फीच लागला. त्यांनी आघाडी भक्कम करताना चेक प्रजासत्ताकला तीन गुणांनी मागे टाकले. भारत भारत भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या