2022 मध्ये होणाऱ्या फिफा अंडर -17 महिला वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

भारत 2022 मध्ये फिफा अंडर -17 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

भारत 2022 मध्ये फिफा अंडर -17 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन फिफाने याची पुष्टी केली असून, 2022 मध्ये अंडर -17 महिला विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे.  

सिरी ए फुटबॉल लीग : रोनाल्डोच्या दोन गोलने जुव्हेंटसचा दमदार विजय 

फिफाने 2020 मध्ये होणारा अंडर -20 महिला विश्वचषक आणि अंडर -17 महिला विश्वचषक पुढील वर्षाच्या सुरवातीला घेण्याचा विचार केला होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या आगामी स्पर्धेवर देखील अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे, या स्पर्धांसाठी घेण्यात येणारे पात्रता फेरीचे सामने देखील पूर्ण करणे देखील कठीण झाले असल्याचे फिफाने म्हटले आहे. आणि त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून या दोन्ही 2020 मध्ये होणाऱ्या युवा महिला स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फिफाने नमूद केले. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : न्यू कॅसलवर विजय मिळवत चेल्सी दुसऱ्या स्थानी झेप  

या स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात करण्यात आल्यानंतर पुढील नियोजित स्पर्धांची जबाबदारी यजमान असलेल्या देशांनाच देण्याची शिफारस फिफाने केली आहे. त्यानुसार कोस्टा रिका 2022 मध्ये फिफा अंडर -20 महिला विश्वचषक आणि 2022 मध्ये फिफा अंडर -17 महिला विश्वचषक आयोजित करेल.  

  


​ ​

संबंधित बातम्या