प्रभावहीन खेळामुळे आव्हान संपले - क्रूझ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आमचा प्रभावहीन खेळ युरो स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरला, अशी कबुली जर्मनीचा मिडफिल्डर टॉनी क्रूझने दिली.

लंडन - इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आमचा प्रभावहीन खेळ युरो स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरला, अशी कबुली जर्मनीचा मिडफिल्डर टॉनी क्रूझने दिली. विम्बले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने २-० असा विजय मिळवून बाजी मारली.

जर्मनीच्या ३-५-२ या व्यूहरचनेला प्रभावहीन करणारा खेळ प्रामुख्याने उत्तरार्धात केला. पहिल्या अर्धात दोघांचाही पवित्रा बचावात्मक होता. पहिला गोल होईपर्यंत सामना समान पातळीवर होता. दोन्ही संघ एकमेकांना रोखून धरत होते, परंतु उत्तरोत्तर आमचा खेळ प्रभावहीन होत गेला, आम्ही स्पर्धेतील अतिशय कठीण गटातून आगेकूच केली होती, परंतु अशा प्रकारे खेळ करून स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येणे निशाजनक आहे, असे क्रूझ म्हणाला.

मार्गदर्शक लोव यांचे पर्व संपले
जर्मनीच्या या पराभवाबरोबर त्यांचे दीर्घ काळ असलेले मार्गदर्शक  जोशिम लोव यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपला. १९६६ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर प्रथमच बाद फेरीत इंग्लंडने जर्मनीचा पराभव केला आहे. हा पराभव आम्हा सर्वांना निराश करणारा आहे. अधिक चांगला खेळ करण्याची अपेक्षाही होती. असे जोशिम लोव यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या