ब्राझीलियन आघाडीपटूने ओडिशाचा पराभव टाळला, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखलं

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

केरळा ब्लास्टर्सचा ही 17 सामन्यातील सातवी बरोबरी ठरली. त्यांचे १६ गुण झाले असून नववा क्रमांक मिळाला आहे. ओडिशाने 16 लढतीत सहावी बरोबरी नोंदविली. नऊ गुणांसह त्यांचा शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

पणजी : ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियोने नोंदविलेल्या दोन गोलच्या जारोवर ओडिशा एफसीने केरळा ब्लास्टर्सला 2-2 गोल बरोबरीत रोखले.  सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दोन्ही संघातील सामना रंगला होता.  केरळा ब्लास्टर्ससाठी 52व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने बरोबरीचा गोल केला, नंतर इंग्लंडच्या गॅरी हूपरने 68 व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याने ओडिशाला 45व्या मिनिटास आघाडीवर नेले होते, त्यानंतर त्यानेच 74 व्या मिनिटास संघाची पिछाडी भरून काढली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही संघांनी आघाडीसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण गोलरक्षक दक्ष राहिल्यामुळे गोलबरोबरी कायम राहिली.

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

केरळा ब्लास्टर्सचा ही 17 सामन्यातील सातवी बरोबरी ठरली. त्यांचे १६ गुण झाले असून नववा क्रमांक मिळाला आहे. ओडिशाने 16 लढतीत सहावी बरोबरी नोंदविली. नऊ गुणांसह त्यांचा शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला. पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटास ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने गोलशून्य बरोबरीची कोंडी भेदताना ओडिशा एफसीला आघाडी मिळवून दिली. त्याने जेरी माविहमिंगथांगा याच्या असिस्टवर मॉरिसियो याने जागा सोडून पुढे आलेला गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला गुंगारा देत चेंडूला आरामात नेटची दिशा दाखविली. त्याचा हा स्पर्धेतील आठवा गोल ठरला. पूर्वार्धात संधी गमावल्यामुळे केरळा ब्लास्टर्सचे नुकसानच झाले. मॉरिसियोने स्पर्धेतील नववा गोल नोंदवत ओडिशाला पिछाडीनंतर बरोबरी साधून दिली.

एकच फाईट वातावरण टाईट; पुरुषाला नमवत महिलेनं पटकावलं 1 मिलियनचं बक्षीस (VIDEO)

पूर्वार्धात गमावलेल्या संधीची भरपाई केरळा ब्लास्टर्सने उत्तरार्धाच्या सुरवातीसच केली. गॅरी हूपर व जॉर्डन मरे या आक्रमणातील जोडगोळीने ओडिशाच्या बचावफळीवर दबाव टाकत संघाला बरोबरी साधून दिली. गोलचे जास्त श्रेय हूपर याला जाते. जेकब ट्रॅट याने रचलेल्या चालीवर हूपरने चेंडूवर ताबा राखत ओडिशाच्या बचावफळीतील चुकीचा लाभ घेत मरेच्या दिशेने चेंडू सुरेखपणे क्रॉसपास केला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूने स्पर्धेतील वैयक्तिक सातवा गोल केला. त्यानंतर हूपरने स्वतः गोल नोंदवत केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. इंग्लिश आघाडीपटूने सहल अब्दुल समद याच्या असिस्टवर गोलरक्षक अर्शदीप सिंगला सहजपणे चकविले.


​ ​

संबंधित बातम्या