सलग चौथ्या स्पर्धेत इटली स्पेन लढणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

शुक्रवारी आणि शनिवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटेपर्यंत) रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतींनी युरोतील उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले. पहिली उपांत्य लढत इटली आणि स्पेन यांच्यात आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटेपर्यंत) रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतींनी युरोतील उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले. पहिली उपांत्य लढत इटली आणि स्पेन यांच्यात आहे. या प्रतिस्पर्ध्यांत सलग चौथ्या स्पर्धेत लढत होत आहे, तर इंग्लंड आणि डेन्मार्क स्पर्धा इतिहासात केवळ दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत.

स्पेनने २००८ च्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत इटलीस शूटआऊटवर ४-२ असे हरवले. चार वर्षांनी प्रतिस्पर्ध्यातील गटसाखळी लढत बरोबरीत सुटली. अंतिम फेरीत स्पेनने ४-० बाजी मारली. चार वर्षांनी इटलीने याचे उट्टे काढताना उपउपांत्यपूर्व फेरीत २-० बाजी मारली. गतविश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्पेनने इटलीस त्यांच्या देशात १-१ रोखले, तर मायदेशात ३-० बाजी मारली. याच प्रतिस्पर्ध्यात यूएफा नेशन्स लीगमध्ये ऑक्टोबर महिन्यात उपांत्य लढत आहे.

इंग्लंड आणि डेन्मार्क १९९२ च्या गटसाखळी लढतीनंतर प्रथमच युरो स्पर्धेत लढतील. त्यावेळी लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. दहा वर्षांनी विश्वकरंडक स्पर्धेत विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने ३-० बाजी मारली. यूएफा नेशन्स लीगमध्ये मायदेशात इंग्लंडने गोलशून्य रोखल्यावर डेन्मार्कने इंग्लंडला त्यांच्या देशात १-० हरवले. ही लढत युरोची उपांत्य लढत होणाऱ्या वेम्बले स्टेडियमवरच झाली होती. त्यात निर्णायक गोल केलेला ख्रिस्तियन एरिक्सनसाठी डेन्मार्क एकटवले आहेत. 

उपांत्य लढतीचा कार्यक्रम

  • इटली वि. स्पेन - ६ जुलै (मध्यरात्री १२.३०)
  • इंग्लंड वि. डेन्मार्क - ७ जुलै (मध्यरात्री १२.३०)
  • अंतिम लढत - ११ जुलै, मध्यरात्री १२.३०

कोपा अमेरिका लढती
उपांत्य फेरी

  • ब्राझील वि. पेरु - ६ जुलै, पहाटे ४.३०
  • अर्जेंटिना वि. कोलंबिया - ७ जुलै, सकाळी ६.३०
  • तिसऱ्या क्रमांकाची लढत - १० जुलै, पहाटे ५.३०
  • अंतिम लढत - ११ जुलै, पहाटे ५.३०

​ ​

संबंधित बातम्या