झिनेदिन झिदान यांचा रेयाल माद्रिदला गुडबाय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

निष्णात खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून फुटबॉल क्लब विश्वात नाव कमावणाऱ्या झिनेदिन झिदान यांनी पुन्हा एकदा रेयाल माद्रिदला गुडबाय केले आहे. ११ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना प्रथमच मार्गदर्शक म्हणून यंदा कोणतीच स्पर्धा जिंकता आलेली नाही.

माद्रिद - निष्णात खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून फुटबॉल क्लब विश्वात नाव कमावणाऱ्या झिनेदिन झिदान यांनी पुन्हा एकदा रेयाल माद्रिदला गुडबाय केले आहे. ११ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना प्रथमच मार्गदर्शक म्हणून यंदा कोणतीच स्पर्धा जिंकता आलेली नाही. 

झिदान हे रेयाल माद्रिदचे महत्त्वाचे घटक होते. क्लबला मार्गदर्शन करताना झिदान यांनी इतिहास घडविलेला आहे, असा उल्लेख रेयाल माद्रिदने झिदान यांना निरोप देताना पत्रकात म्हटले आहे. झिदान यांचा करार २०२२ पर्यंत होता.

झिदान यांनी दुसऱ्यांदा रेयाल माद्रिद क्लब सोडला आहे. २०१६-१८ या ती वर्षात रेयाल माद्रिदला सलग तीन वेळा त्यांनी चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला होता. झिदान यांच्या दोन वर्षे आणि पाच महिन्यांच्या त्या काळात रेयालने एकूण नऊ करंडक जिंकले होते. यात दोन क्ल्ब वर्ल्डकप, दोन युएफा सुपर कप, एक स्पॅनिश कप आणि एक स्पॅनिश सुपर कपचा समावेश आहे.

दुसऱ्यांदा रेयाल माद्रिदचे मार्गदर्शक झाल्यावर त्यांना एकदाच स्पॅनिश लीग आणि स्पॅनिश सुपर लीगचे विजेतेपद मिळवता आले, परंतु यंदाच्या मोसमात त्यांची झोळी रिकामीच राहिली.

रेयाल माद्रिदला निरोप देताना झिदान यांनी भविष्याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. आपल्याशिवाय रेयाल माद्रिद क्लब चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


​ ​

संबंधित बातम्या