बार्सिलोनाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे मेस्सीचे आवाहन 

संजय घारपुरे
Thursday, 1 October 2020

अवघ्या काही आठवड्यांपूर्वी लिओनेल मेस्सी बार्सिलोना सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होता, पण आता त्याने आपल्यातील संघर्ष संपुष्टात आणू आणि बार्सिलोनास अव्वल बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करू या, असे आवाहन केले. 

बार्सिलोना : अवघ्या काही आठवड्यांपूर्वी लिओनेल मेस्सी बार्सिलोना सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होता, पण आता त्याने आपल्यातील संघर्ष संपुष्टात आणू आणि बार्सिलोनास अव्वल बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करू या, असे आवाहन केले. 

IPL 2020 : महिला मिनी आयपीएलच्या तारखा ठरल्या!

बार्सिलोनाचा निरोप घेण्याची मोहीम अपयशी ठरल्यानंतरच्या दुसऱ्याच मुलाखतीत मेस्सीने संघाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. "माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मात्र या चुका बार्सिलोना संघास अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करतानाच झाल्या आहेत. मी काही बोलल्याने अथवा काही केल्याने क्‍लबमधील कोणाला दुखावले तर माझ्या हेतूबाबत कोणी शंका घेऊ नयेत. क्‍लबच्या हितासाठी, प्रगतीसाठीच मी प्रयत्न करणार आहे,'' असे मेस्सीने सांगितले. गतमोसमात संघाला एकही विजेतेपद जिंकू न देता आपण क्‍लबचा निरोप घेत होतो, हेच जणू मेस्सीने यावेळी सूचित केले होते. 

हैदराबादविरुद्ध आम्ही चारी मुंड्या चीत - रिकी पॉंटिंग 

मेस्सीची ही बदललेली भूमिका काहीशी धक्कादायकच आहे. गेल्या आठवड्यात लुईस सुआरेझने बार्सिलोनाचा निरोप घेतल्यावर त्याने क्‍लब व्यवस्थापनावर टीका केली होती. आता मला कशाचाही धक्का बसत नाही, असे त्याने सांगितले होते. आता तोच सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहे. क्‍लबला यशस्वी करण्याची आपली प्रबळ इच्छा, लक्ष्य एकत्र आले. आपण सर्वांनी एकाच दिशेने प्रयत्न करायला हवेत, असे मेस्सीने सांगितले.

 

 


​ ​

संबंधित बातम्या