आयएसएलचा तरुण संघनायक : लालेगंमविया

दीपक कुपन्नावर  
Wednesday, 2 December 2020

प्रतिभावंत खेळाडूंचे हेच वैशिष्ठ असते. त्यांना संधी मिळाली की जीव आतून ती सार्थकी लावत आपण इतरापेक्षा का वेगळे आहोत हेच ते सिध्द करतात. त्यामुळेच ते अल्पावधीत भरारी घेतात. लालेगंमवियाच्या कारकिर्दिवर नजर टाकल्यास याची आपल्याला प्रचिती येते.

संघनायक म्हणजे संघाचा आधारस्तंभ. कर्णधाराला स्वतः तर उत्कुष्ठ खेळयाचेच त्याचबरोबर संघाची चांगली कामगिरी होण्यासाठी संघसहकायांना प्रोत्साहित करण्याबरोबर संघभावना वाढविणे अशी दुहेरी जवाबदारी पेलावी लागते. त्यामुळे एकवेळ उत्कृष्ठ खेळाडू बनने सोपे पण उत्कुष्ठ संघनायक बनने खडतर मानले जाते. गतहंगामातील लिग विनर्स शिल्ड विजेत्या एफसी गोवा संघाविरुध्द नाँर्थ ईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक गेराँड नस यांनी सोपविलेले संघनायकाचे लालेगंमवियाने शिवधनुष्य यशस्वीपणे पेलून सर्वानांच अचंबित केले. त्याने जिगरबाज खेळ करुन सामन्याचा सामनावीर किताब पटकावून आपली निवड सार्थ ठरवत कारकिर्दित चार चांद लावले. या निमिताने त्याच्या प्रतिभा पुन्हा अधोरेखित झाली.
 

देशातील कोरोना काळातील सर्वात मोठी क्रिडास्पर्धा म्हणून इंडियन सुपर लिग (आयएसएल) उल्लेख केला जातो आहे. भारतीय फुटबाँल मधील सर्वीच्च मानली जाणारी ही स्पर्धा गोव्यात सुरक्षिततेची खबरदारी घेत विनाप्रेक्षक सुरु आहे. स्पर्धेची तिसरी फेरी सुरु आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाच्या संघनायकावर नजर टाकल्यास मातब्बर परदेशी खेळाडूवरच परदेशी प्रशिक्षकांनी विश्वास दाखविल्याचे दिसते. यात डँनी फाँक्स (ईस्ट बंगाल), स्टीव्हन टेलर (आडीसा) कोस्टा नेमिनसो (केरला ब्लास्टर्स), एदू बेदिया (गोवा), जोवो व्हिक्टर ( हैद्राबाद), राँयकृष्णा (एटीके मोहन बागान) यांचा समावेश आहे.  याला अपवाद आहेत बंगलुरुचा अनुभवी सुनिल छेत्री. त्यात भर पडली आहे नाँर्थ ईस्ट युनायटेडच्या वीस वर्षीय मध्यरक्षक लालेगंमवियाची. धक्का बसला ना लालेगंमवियाचे वय एकुण. होय मेघालयाचा लालेगंमविया हा आयएसएलमधील सर्वात तरुण संघनायक ठरला आहे.

प्रतिभावंत खेळाडूंचे हेच वैशिष्ठ असते. त्यांना संधी मिळाली की जीव आतून ती सार्थकी लावत आपण इतरापेक्षा का वेगळे आहोत हेच ते सिध्द करतात. त्यामुळेच ते अल्पावधीत भरारी घेतात. लालेगंमवियाच्या कारकिर्दिवर नजर टाकल्यास याची आपल्याला प्रचिती येते. वयाच्या सहाव्यावर्षी फुटबाँल किक मारत शिलाँगच्या या खेळाडूच्या जीवनात भारतात झालेली सतरा वर्षाची विश्वचषक फुटबाँल स्पर्धा टर्निगं पाँईट ठरली. कारण याच स्पर्धेच्या निमिताने त्याची प्रतिभा स्पष्ट झाली. गुणवंत फुटबाँलपटूंची खाण मानल्या जाणाया पुर्वेकडील राज्यांतील तो एकमेव खेळाडू या संघात होता. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. इंडियन एरोज संघातून दोन हंगामात घौडदौड करीत आयलिगमध्येही टँलेन्ट सिध्द केले. साहजिकच या लंबी रेस का घोड्यावर पुर्वेकडील गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी धडपडणाया ऩाँर्थ ईस्ट युनायटेडचे लक्ष गेले नाही तरच नवल. त्याची आयएसएलमध्ये गतहंगामात पासेसची 80 तर यंदा त्याची 74 टक्के अचुकता आहे. पासिंग बरोबरच टँकलिंगमध्येही तो तरबेज आहे. साहजिकच भविष्यात तो भारतीय संघाचा मुख्य खेळाडू असेल हे प्रशिक्षक नस यांचे भाकित सत्यात उतरवेल यात शंका नाही.


​ ​

संबंधित बातम्या