नेमारने रोनाल्डो, मेस्सीला टाकलं मागे; एका वर्षासाठी 'पुमा'ने मोजले इतके अब्ज रुपये

टीम ई-सकाळ
Saturday, 19 September 2020

ब्राझीलचा आणि फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाचा फुटबॉलपटू नेमारने क्रीडा क्षेत्रातील दिग्गज जर्मनच्या 'पुमा' सोबत करार केला आहे.

ब्राझीलचा आणि फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाचा फुटबॉलपटू नेमारने क्रीडा क्षेत्रातील दिग्गज जर्मनच्या 'पुमा' सोबत करार केला आहे. आणि या करारात नेमारने पोर्तुगाल व जुवेंट्सच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोला देखील 8 मिलियन युरोने मागे टाकले आहे. 

IPL 2020; MIvsCSK Live : धोनीचा संघ जिंकणार की हिटमॅन रोहितचा?

नेमारचा 'नाईके' बरोबरचा मागील करार 11 वर्षांचा होता. त्यानंतर नेमारने 'पुमा' सोबत केलेल्या नवीन कराराची किंमत 23 मिलियन युरो आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार याची किंमत 2 अब्ज 45 लाख इतकी ठरते. त्यामुळे नेमारने 'पुमा' सोबत केलेला हा करार 'नाईके'च्या पूर्वी केलेल्या 11 मिलियन युरोपेक्षा दुप्पट आहे. तसेच नेमारचा 'नाईके' सोबतच करार अजून दोन वर्षांसाठी बाकी होता. पण 'पुमा'साठी नेमारने हा करार मोडला आहे. तर अर्जेंटिना आणि बार्सिलोना क्लबचा खेळाडू व सहा वेळा बॅलन डी ओअरचा विजेता लिओनेल मेस्सीचा 'आदिदास'सोबतच करार हा 18 मिलियन युरोचा आहे.    

IPL 2020 : रोहित शर्माच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

दरम्यान, पीएसजी आणि मार्सेली यांच्यात झालेल्या सामन्यात, नेमारने अलवारो गोन्झालेझला मारलेली चपराग चांगलीच महागात पडली आहे. त्यानंतर फ्रेंच प्रोफेशनल फुटबॉल डिसिप्लिन कमिशनने (एलपीएफ) नेमारवर या प्रकरणावरून दोन सामन्यांची बंदी घातली आहे. अलवारो गोन्झालेझने वर्णद्वेषी टिप्पणी केल्यामुळे त्याला चपराग मारल्याचे नेमारने सामन्यानंतर म्हटले होते. इतकेच नाही तर गोन्झालेझच्या चेहऱ्यावर चपराग मारता आले नसल्याबद्दल पश्चाताप वाटल्याचे नेमारने म्हटले होते.             


​ ​

संबंधित बातम्या