रेयालची तीन गोलच्या फरकाने हार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

या मोसमात सुरुवातीस कॅदिझ आणि शाख्तार दोनेस्तस्क यांच्याविरुद्धच्या पराभूत झालेल्या रेयालने बार्सिलोना, हुएस्का आणि इंटर मिलानला हरवले होते; पण पुन्हा रेयालची कामगिरी खालावली. ते आता ला लिगा क्रमवारीत चौथ्या स्थानावर गेले आहेत.

बार्सिलोना :  रेयाल माद्रिदला ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये व्हलेन्सिया 1-4 अशी तीन गोलच्या फरकाने हार पत्करावी लागली. या पराभवामुळे गतविजेत्या रेयालच्या क्षमतेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. करीम बेनझेमाने रेयालला आघाडीवर नेले; पण त्यांनी व्हॅलेन्सियाला तीन पेनल्टी किक आणि एका स्वयंगोलची भेट दिली. या पराभवाचे कोणतेही समर्थन करणार नाही. आम्ही वाईट खेळलो, असे रेयाल माद्रिदचे मार्गदर्शन झिनेदीन झिदान यांनी सांगितले. रेयालने 2018 नंतर प्रथमच एका सामन्यात चार गोल स्वीकारले. 

या मोसमात सुरुवातीस कॅदिझ आणि शाख्तार दोनेस्तस्क यांच्याविरुद्धच्या पराभूत झालेल्या रेयालने बार्सिलोना, हुएस्का आणि इंटर मिलानला हरवले होते; पण पुन्हा रेयालची कामगिरी खालावली. ते आता ला लिगा क्रमवारीत चौथ्या स्थानावर गेले आहेत. आघाडीवरील रेयाल सोशिएदाद आणि रेयाल माद्रिद यांच्यात चार गुणांचा फरक आहे. त्यातच बेनझेमा याला दुखापत झाल्याने रेयाल माद्रिदची डोकेदुखी वाढली आहे. रेयाल सोशिएदादने ग्रॅनाडास 2-0 असे हरवून आपले अग्रस्थान भक्कम केले होते. रेयाल सोशिएदाद आणि ॲटलेटिको माद्रिद यांच्यात तीन गुणांचा फरक आहे, पण ॲटलेटिको दोन सामने कमी खेळले आहेत. 

Womens T20 Challenge 2020 Final : स्मृतीच्या सिक्सरनं करुन दिली दादाच्या खेळीची आठवण!

एसी मिलानने हार टाळली

झ्लॅतन इब्राहिमोविकने पेनल्टी किक दवडल्यामुळे एसी मिलानला सिरी ए मध्ये हेल्लास वेरोनाविरुद्ध 2-2 बरोबरी स्वीकारावी लागली. इब्राहिमोविकने अखेरच्या मिनिटात गोल केल्यामुळे मिलानची हार टळली होती. त्यापूर्वी इंटर मिलान तसेच युव्हेंटिसला 1-1 बरोबरीस सामोरे जावे लागले होते. युव्हेंटिस यामुळे पाचव्या क्रमांकावर गेले आहेत. आघाडीवरील एसी मिलान आणि युव्हेंटिस यांच्यात चार गुणांचा फरक आहे. रोनाल्डोने पूर्वार्धात केलेल्या गोलचा फायदा युव्हेंटिसला लाझिओविरुद्ध घेता आला नाही. 

सिटीने संधी दवडली

केविन डे ब्रुईन याने पेनल्टी दवडल्याने मॅंचेस्टर सिटीला लिव्हरपूलविरुद्ध 1-1 बरोबरीवर समाधान मानावे लागले. या बरोबरीमुळे लिव्हरपूलची प्रीमियर लीगमध्ये अव्वल येण्याची संधी दुरावली. लिस्टरने वेस्ट वोल्वज्‌ला 1-0 असे हरवून आघाडी राखली. त्यांनी वेस्ट ब्रॉमला 1-0 असे हरवलेल्या टॉटनहॅमला मागे टाकले आहे. ॲस्टॉन व्हिलाने आर्सेनलचा 3-0 असा धुव्वा उडवला. आर्सेनलचा सहा सामन्यांतील हा चौथा पराभव.  


​ ​

संबंधित बातम्या