ब्यूटीफुल लेडीनं रचला इतिहास; पुरुषांच्या सामन्यात रेफ्रीचा रुबाब

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

2010 मध्ये चॅम्पियनशिप मॅचवेळी दुखापतग्रस्त टोनी बेट्स यांच्या जागी दुसऱ्या हाफमध्ये ती रेफ्री म्हणून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

रेबेका वेल्‍च इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये पुरुषांच्या सामन्यात रेफ्रीची भूमिका बजावणारी पहिली महिला ठरली. हॅरोगेट टाउन आणि औश्र पोर्ट यांच्यातील सामन्यात रेबेका वेल्‍च हिने रेफ्रीची भूमिका बजावत नवा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी तिने राष्ट्रीय लीगमध्ये पुरुषांच्या सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहिले होते. 2017 मध्ये महिलांच्या AFA कप फायनलमध्ये ती दिसली होती. 

2010 मध्ये चॅम्पियनशिप मॅचवेळी दुखापतग्रस्त टोनी बेट्स यांच्या जागी दुसऱ्या हाफमध्ये ती रेफ्री म्हणून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. अधिकृतरित्या महिला रेफ्री म्हणून नियुक्त होणारी ती पहिली महिला ठरली आहे. नियुक्तीनंतर ईएफएल वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की,  रेफ्री म्हणून सुरु झालेल्या प्रवासाचा अभिमान वाटतो. कोणतेही लक्ष्य न ठेवता या खास क्षणाची अनुभूती घेत असून हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असा आहे. 

कॅप्टन्सीची नो वॅकन्सी; स्मिथच्या 'बोलंदाजी'नंतर कोचची फटकेबाजी​

कोण आहे रेबेका वेल्च

37 वर्षीय रेबेका वेल्च ही वॉशिंग्टनची असून तिने 7 नॅशनल लीग टुर्नांमेंटमध्ये रेफ्रीची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या संकटापूर्वी तिने ज्या ज्या सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहिले तो सामना पाहायला तिचे वडिल सोबत असायचे. तिच्या आईला फुटबॉलमधील काहीच समजत नाही, पण लेकीच्या प्रवासाबद्दल ती उत्सुक दिसते. ती एवढी उत्सुक का असते? असा प्रश्न खुद्द रेबेकाला पडते. इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने तिचा प्रवास सुरु झाला आहे


​ ​

संबंधित बातम्या