Video : 'कॅप्टन कूल' धोनी वळाला सेंद्रीय शेतीकडे!

टीम ई-सकाळ
Thursday, 27 February 2020

धोनीनं अखेरचा सामना जुलै 2019मध्ये खेळला आहे. त्यामुळे त्याचं टीम इंडियातील कमबॅक हे आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल.

रांची : २ मार्चला सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तयारीसाठी धोनी चेन्नईमध्ये कधी पोहचणार आणि कधी तयारी सुरु करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. धोनी क्रिकेटमधून निवृत्ती निवृत्ती घेणार की काय अशी चर्चा रंगलेली असतानाच धोनीचा चक्क शेती करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आठ महिन्यामासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्यातच हा व्हायरल व्हिडिओ चर्चेचा ठरला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२९ मार्चला सुरु होणाऱ्या आयपीएलची तयारी २ मार्चला सुरु होत आहे. त्यातच धोनीनं फेसबुक अकाउंटवरून शेती करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात धोनी सेंद्रिय शेती करताना दिसत आहे. व्हिडिओ सोबतच्या कॅप्शनमध्ये धोनीने लिहिले आहे की, रांचीमध्ये 20 दिवसांपासून टरबूज आणि पपईची सेंद्रिय शेती सुरू झाली आहे. 

व्हिडिओमध्ये धोनी शेती सुरू करण्यापूर्वी पूजा करताना दिसत आहे. धोनीने काही वेळ शेतीचे कामेही केली. सध्या तो रांचीमध्येच वास्तव्यास आहे. तसेच जेएससीए स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी दाखल झाला, असे सांगण्यात येत आहे.

- INDvsNZ : रहाणे म्हणतो, 'आता बघाच काय करतो ते'

तत्पूर्वी, सोशल मीडियावर धोनीचा जीममधील एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये तो स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या समोरील एका टेबलवर धोनी उडी मारून बसलेला आहे. त्याच्या क्रिकेटप्रेमी चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत 38 वर्षांच्या धोनीनं केलेल्या या स्टंटचे कौतुक केले आहे.

- Women's T20 World Cup : वय 16, पहिला वर्ल्डकप अन् केला 'हा' खतरनाक रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 29 मार्चला मुंबईतील वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. याआधी धोनी सराव सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना जुलै 2019मध्ये खेळला आहे. त्यामुळे त्याचं टीम इंडियातील कमबॅक हे आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे.

- टेनिस 'सौंदर्यसम्राज्ञी' मारिया शारापोव्हाचा टेनिसला अलविदा!

चेन्नई सुपर किंग्जला दोन वर्षासाठी आयपीएलमधून निलंबित केले होते. त्यानंतर चेन्नईने दमदार पुनरागमन केले आहे. त्यामध्ये धोनीचा मोठा वाटा आहे. यंदाचे आयपीएल चेन्नईसाठी लाभदायक ठरणार का? याकडेच सगळ्या माहीप्रेमींचे लक्ष लागले आहे.


​ ​

संबंधित बातम्या