अश्‍वारोहण ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत फौआद मिर्झाला सुवर्ण

वृत्तसंस्था
Monday, 14 October 2019

- आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्‍वारोहण प्रकारात दोन रौप्यपदकांचा मानकरी असणाऱ्या फौआद मिर्झा याने पोलंडमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली ः आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्‍वारोहण प्रकारात दोन रौप्यपदकांचा मानकरी असणाऱ्या फौआद मिर्झा याने पोलंडमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आशिया पॅसिफिक विभागात वैयक्तिक ग प्रकारात सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या फौआद याने फेर्नहिल फेसटाईम या घोड्यासह आशियाई स्पर्धेत 34 गुणांची कमाई केली. त्यानंतर टचिंगवूड या दुसऱ्या घोड्यासह सहभागी होताना आशियाई स्पर्धेतच त्याने 30 गुण मिळविले. त्यानंतर आता तिसऱ्या "दजारा' या घोड्यासह ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत सहभागी होताना त्याने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. या नव्या घोड्यासह सहभागी होताना आपल्याला वेगळाच आनंद मिळाला. आठ वर्षांच्या या घोड्यासह आता आपल्याला ऑलिंपिक स्पर्धेत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया फौआद याने व्यक्त केली. फौआद आता इटली आणि फ्रान्स येथील स्पर्धेतही सहभागी होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या