पिंजऱ्यातून आम्हाला मोकळे करा

संजय घारपुरे
Thursday, 23 July 2020

राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील हॉस्टेलमध्ये आम्हाला डांबले आहे. सरावाचीही फारशी संधी मिळत नाही, त्यामुळे आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या, असे पत्र देशातील अव्वल खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयास लिहिले असल्याचे समजते.

चंडिगड : राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील हॉस्टेलमध्ये आम्हाला डांबले आहे. सरावाचीही फारशी संधी मिळत नाही, त्यामुळे आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या, असे पत्र देशातील अव्वल खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयास लिहिले असल्याचे समजते. आम्हाला क्रीडा हॉस्टेलमधील रुम ते सरावाचे ठिकाण एवढेच जाता येते. अन्यवेळ रुममध्येच रहावे लागते. सरावासाठीही फारसा वेळ दिला जात नाही. माफक गोष्टींसाठीही सातत्याने विनंती करावी लागते अशी तक्रार या खेळाडूंनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागतिक विजेत्या सिंधूचा घरातच 'सराव' 

आमचा मुक्काम क्रीडा संस्थेतच आहे. आम्हाला आवारातही फिरण्यास मनाई आहे. मात्र याच संस्थेत काम करणारे कर्मचारी, गार्ड हे त्यांच्या घरी जात आहेत. आता आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला लागण होईल असे सांगितले जाते. या कर्मचाऱ्यांमुळेही आम्हाला लागण होण्याचा धोका आहे असे या खेळाडूंचे म्हणणे आहे. राष्ट्रीय मार्गदर्शकांना संस्थेबाहेर गेले तर आत येण्याची परवानगी नाही, पण कर्मचाऱ्यांना आहे हा कोणता नियम अशी विचारणा त्यांनी केली. पुरेसा सराव होत नसेल, तर घरी गेलेलेच चांगले असे या खेळाडूंनी म्हटले आहे.

सेरेनाची 2 वर्षाची मुलगी संघाची मालक

शिबिरासाठी राष्ट्रीय क्रीडा संस्थेत थांबवलेल्या खेळाडूंना घरची कमालीची ओढ लागली आहे. अनेक खेळाडू विशेषतः महिला क्रीडापटू रोज घरी जाऊ दे अशी विनंती येथील पदाधिकाऱ्यांना करीत आहेत.

 

 


​ ​

संबंधित बातम्या