Schoolympics 2019 : एकेरी टेनिस स्पर्धेत सार्थक गायकवाडने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झाली. 

कोल्हापूर : बारा वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत सार्थक गायकवाडने सुवर्ण, अरिहिंजय पाटील रौप्य व सिद्धार्थ फराकटेने कास्यपदक पटकाविले. दुहेरीत सुजल देसाई व अरिहिंजय पाटीलने सुवर्ण, मधुराम बागरी व दक्ष जैन रौप्य, तर शिवांश बिर्ला व यश परीखने कास्यपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झाली. 

निकाल असा :

एकेरी - सार्थक गायकवाड (हनुमंतराव चाटे स्कूल) वि. वि. अरिहिंजय पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (८-०), सिद्धार्थ फराकटे (सेंट झेवियर्स हायस्कूल) वि. वि. अभंग फडणीस (विबग्योर हायस्कूल) (८-३). दुहेरी : सुजल देसाई व अरिहिंजय पाटील  (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. मधुराम बागरी व दक्ष जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (८-३), शिवांश बिर्ला व यश परीख ((संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. सावन बजाज व अथर्व कुरुंदवाडे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (८-६).

 

 

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या