Schoolympics 2019 : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ; सोनल पाटीलला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा झाली. 

कोल्हापूर : सोळा वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत सोनल पाटीलने सुवर्ण, सानिया मोरे रौप्य व जरीन इनामदारने कास्यपदक पटकाविले. दुहेरीत सोनल पाटील व कृषी ठक्करने सुवर्णपदकावर नाव कोरले. जानवी चाटे व प्रांजल कोठारीला रौप्य, तर स्नेहा मोदी व प्राजक्ता पाटीलला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा झाली. 

निकाल असा :

एकेरी : सोनल पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. सानिया मोरे (पोदार इंटरनॅशनल स्कूल) (८-०), जरीन इनामदार (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. मरियम शेख (होलिक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल) (८-५). दुहेरी : सोनल पाटील व कृषी ठक्कर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. जानवी चाटे व प्रांजली कोटलवार (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (८-०), स्नेहा मोदी व प्राजक्ता पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. अस्मी बनकर व वाणी मेहता (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (८-१).


​ ​

संबंधित बातम्या