हॉट मॉडेलच्या गराड्यात गेल; व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

पंजाब किंग्ज (पूर्वीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा  राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात पंजाबच्या फ्रेंचायझी संघाला त्याच्याकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा निश्चितच असेल.

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला सुरुवात झालीये. किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या ताफ्यातून स्फोटक फलंदाजी करण्यासाठी  कॅरेबियन किंग ख्रिस गेल (Chris Gayle) सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी क्रिस गेलचा एक म्युझीक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.  11 एप्रिलला गेलने जमेका टू इंडिया (Jamaica To India) नावाने हा अल्बम रिलीज केलाय. 

या गाण्यात क्रिस गेलने इंडियन रॅपर एमीवे बंटाई (Emiway Bantai) ची मदत घेतली असून गाण्यात  ख्रिस गेल हॉट मॉडेलच्या गराड्यात डान्स करताना दिसते. क्रिस गेलच्या डान्स स्टेप्स या भल्या भल्या डान्सरच्या भुवय्या उंचावणाऱ्या आहेत, अशा प्रतिक्रिया त्याच्या व्हिडिओवर उमटल्या आहेत. यूट्यूबवर हे गाणे टॉपमध्ये आहे. आतापर्यंत 40 लाख नेटकाऱ्यांनी हे गाणे पाहिले असून  गेलच्या हटके अंदाजाला चांगलीच पसंती मिळताना दिसते. ख्रिस गेल हा भारतीय गाण्यांचा शौकीन आहे. यापूर्वीही त्याचे अनेक व्हिडिओ व्हायर झाल्याचे पाहायला मिळाले होते. यात तो बॉलिवूडच्या गाण्यांसह सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळाले होते.

CSK चा पराभव का झाला? सुरेश रैनानं दिलं स्पष्टीकरण

युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या एन्ट्रीनंतर पंजाबने दमदार कमबॅक केले होते. त्याला पहिल्यापासून संघात स्थान मिळाले असते तर पंजाबचा संघ आणखी ताकदवान ठरला असता. ही गोष्ट लक्षात ठेवूनच यंदाच्या हंगामात त्याला पहिल्यापासून खेळवण्यावर भर देण्याचा प्लॅन पंजाबच्या संघाने आखलाय. तो यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

पंजाब किंग्ज (पूर्वीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा  राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात पंजाबच्या फ्रेंचायझी संघाला त्याच्याकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा निश्चितच असेल. गाण्याप्रमाणे तो मैदानातही फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरला तर त्याचा पंजाबला फायदाच होईल.  
 


​ ​

संबंधित बातम्या