IPL 2021 : राहुल चाहरनं होणाऱ्या बायकोसोबत पोस्ट केला फोटो

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 April 2021

IPL 2021 : 22 वर्षीय राहुलनं इन्स्टाग्रामवर हेअर स्‍टायलिस्‍टसोबत पोस्ट करत आपल्या स्टाइलिश केसाचं रहस्य उलघडलं आहे. 

मुंबई इंडियन्स संघातील आघाडीचा फिरकीपटू राहुल चाहर यानं आपल्या हटके हेअर स्टाइलचं गुपित उघड केलं आहे. राहुल चाहरला आपण वेगवेगळ्या लूकमध्ये अनेकदा पाहिलं. त्याच्या हेअर स्टाइलची सोशल मीडियावर चर्च असते. त्याच्या या हेअर स्टाइल मागे होणारी पत्नी आहे. 22 वर्षीय राहुलनं इन्स्टाग्रामवर हेअर स्‍टायलिस्‍टसोबत पोस्ट करत आपल्या स्टाइलिश केसाचं रहस्य उलघडलं आहे. 

22 वर्षीय राहुल चाहरनं होणारी पत्नी ईशानी हिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही माझी हेअर स्टायलिस्ट असल्याचं सांगितलं आहे. नेटकऱ्यांना राहुल-ईशानी यांची जोडी भावली आहे. 2019 मध्ये ईशानी आणि राहुल यांचा साखरपुडा पार पडला होता. 

गेल्या काही दिवसांपासून राहुलनं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. नुकतीच त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही राहुल यानं दिमखदार कामगिरी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. तीन सामन्यात राहुलनं 89 धावाच्या मोबदल्यात सात विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)


​ ​

संबंधित बातम्या