जोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

जोकोविचला जाळ्यात अडकवण्यासाठी एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क केला होता.

सर्बियाची मॉडेल नतालिया स्केकिचने जगातील अव्वल टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचसंदर्भात धक्कादायक दावा केलाय. जोकोविचला फसवण्यासाठी एका व्यक्तीने 51 लाख रुपयांसह स्पेशल ट्रिपची ऑफर दिली होती, असे मॉडेलने म्हटले आहे. स्वॅट अँण्ड स्कँडल नावाच्या मॅग्जिनसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये नतालिया स्केकिचने हा दावा केला आहे. तिने म्हटलंय की, एका व्यक्तीने जोकोविचला जाळ्यात अडकवण्यासाठी माझ्याशी संपर्क केला होता.

या व्यक्तिला मी लंडनपासून ओळखत होते. त्याला मी सभ्य समजत होते. त्याने मला भेटीसंदर्भात विचारणा केली तेव्हा मला तो व्यावसायिक डिलसंदर्भात बोलणार असेल असे वाटले. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नसल्याचे लक्षात आले. त्याने नोव्हाक जोकोविचला फसवण्यासाठी मला ऑफर दिली. मी जोकोविचशी जवळीक साधावी. एवढेच नाही तर जोकोविच माझ्यासोबत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा प्लॅन त्याने आखला होता, असा धक्कादायक दावा मॉडेलने केला आहे.

INDvsENG : वन-डे इन पुणे! सामना दिसला नसेल; पण क्रिकेट प्रेम पुन्हा दिसलं

ती पुढे म्हणाली की, जोकोविचला जाळ्यात अडकवण्यासाठी त्या व्यक्तीने मला 60 हजार युरो डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय स्पेशल ट्रिपची ऑफरही दिली. सुरुवातीला मला हे सर्व गंमत असल्याचे वाटले. पण तो या विषयी गंभीर होता. हा प्लॅन ऐकल्यानंतर मला अपमानास्पद वाटले. मी त्याची ऑफर फेटाळून लावली. त्याला तिथेच मारावे असा विचार मनात आला पण सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे मी ही गोष्ट टाळली, असेही तिने मुलाखतीमध्ये सांगितले. नोवाक जोकोविचसंदर्भात कोणतीही अन्य महिला अशा प्लॅनमध्ये सामील होणार नाही. जोकोविच आमचा सर्वोत्तम ब्रँड आहे. तो एक चांगला व्यक्ती असून फॅमिली पर्सनची त्याची छबीही उत्तम आहे, असा उल्लेखही मॉडेलने केलाय.


​ ​

संबंधित बातम्या