World Cup 2019 : अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो, हम तुमको लेकर डुबेंगे!

वृत्तसंस्था
Monday, 24 June 2019

भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे. आज त्यांचा सामना बांगलेदशविरुदध  होणार आहे. त्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने बांगलादेशला ''आम्ही तर संपलोच आहोत तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ'' अशी ताकीद दिली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे. आज त्यांचा सामना बांगलेदशविरुदध  होणार आहे. त्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने बांगलादेशला ''आम्ही तर संपलोच आहोत तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ'' अशी ताकीद दिली आहे. 

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नैबने बांगलादेशच्या संघाला उद्देशून ''हम तो डुबे है सनम, तुमको लेकर डुबेंगे,'' असा डायलॉग मारला. 

अफगाणिस्तानला आतापर्यंत सहापैकी एकही सामना जिंकता न आल्याने ते शून्य गुणांसह गुणतक्त्याच्या तळाशी आहेत. बांगलादेशने सहापैकी केवळ दोन सामन्यांत विजय मिळविला आहे. ते सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या