हार्दिकसारखी गुणवत्ता कोणाकडे नाही : सेहवाग

वृत्तसंस्था
Thursday, 16 May 2019

अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे. 

मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल विजेतेपदामध्ये हार्दिक पंड्याचे बहुमोल योगदान राहिलेले आहे. एका टॉक शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्वत्र टीका झाल्यानंतर आयपीएलमधील त्याची कामगिरी अफलातून झालेली आहे. काही काळ त्याला बंदीचा सामना करावा लागला होता. आयपीएलमध्ये हार्दिकने 15 सामन्यांत 191.42 च्या स्ट्राइक रेटने 402 धावा फटकावल्या. 

फलंदाजी आणि गोलंदाजी असा एकत्रित विचार करता हार्दिकच्या जवळपास कोणीही नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी "थ्री डायमेंशन' गुणवत्ता आहे म्हणून ज्याची निवड केली तोही हार्दिकच्या जवळ येऊ शकत नाही, असे सेहवागने म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या