भारतीय हॉकी संघाचा गोलधडाका कायम, स्पेनवर माेठा विजय

वृत्तसंस्था
Sunday, 29 September 2019

-भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील धडाका कायम ठेवताना स्पेनचा दुसऱ्या कसोटीत 5-1 असा धुव्वा उडवला.

-भारताने पहिल्या कसोटीत 6-1 अशी बाजी मारली होती;

-भारताने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ केला; पण पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सुरुवातीस अपयश आले

मुंबई - भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील धडाका कायम ठेवताना स्पेनचा दुसऱ्या कसोटीत 5-1 असा धुव्वा उडवला. भारताने पहिल्या कसोटीत 6-1 अशी बाजी मारली होती; तर त्यापूर्वी बेल्जियमला पहिल्या कसोटीत 2-1 असे पराजित केले होते.
स्पेनविरुद्धच्या पहिल्या कसोटीप्रमाणेच ऍटरुप येथील दुसऱ्या कसोटीतही भारताचे वर्चस्व होते. स्पेनने पहिला गोल तिसऱ्याच मिनिटास करून भारतास हादरवले खरे; पण दोनच मिनिटांत आकाशदीपने गोल करीत भारतास बरोबरी साधून दिली. त्यानंतर एस. व्ही. सुनील (20 व्या मिनिटास), रमणदीप (35) यांनी प्रत्येकी एक; तर हरमनप्रीत सिंगने (41 आणि 51) दोन गोल करीत भारताचा एकतर्फी विजय निश्‍चित केला.
भारताने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ केला; पण पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सुरुवातीस अपयश आले. त्याचबरोबर दवडलेल्या काही संधी भारतास नक्कीच सलत असतील. स्पेनच्या चिवट युवा खेळाडूंनी भारताचा कस बघताना चांगली प्रतिआक्रमणे केली; पण कृष्णन बी. पाठकने सहकारी बचावपटूंच्या साथीत ती प्रामुख्याने निष्प्रभ ठरवला. 
 


​ ​

संबंधित बातम्या