चार दिवसांत दोन सुवर्ण; हिमा दासची दणदणीत कामगिरी

वृत्तसंस्था
Friday, 12 July 2019

हिमा दासने चार दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकत आपल्या जागतिक 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाची वर्षपूर्ती साजरी करीत आहे. तिने पोझनन पाठोपाठ कुतनो अॅथलेटिक्स स्पर्धेत बाजी मारली आहे.

मुंबई : हिमा दासने चार दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकत आपल्या जागतिक 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाची वर्षपूर्ती साजरी करीत आहे. तिने पोझनन पाठोपाठ कुतनो अॅथलेटिक्स स्पर्धेत बाजी मारली आहे.

आज माझ्या जीवनातील सर्वात संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी मी 2018 मध्ये जागतिक वीस वर्षाखालील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. कठोर परिश्रम कायम राखत मी भारतासाठी अधिकाधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करीन असे ट्वीट हिमाने केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या