क्रिकेट

प्रौढ कुमार थंगरासू! क्रिकेटपदार्पणाचं वय उलटलेलं; पण...

काही वेळा सद्‌भाग्य दरवाजाबाहेर चोरपावलांनी येऊन कधी उभं राहतं हे आपल्याला कळतंच नाही. दरवाजा उघडला की सुखद धक्का बसतो. आपण कुण्या सचिन कुलकर्णीची वाट बघत असतो आणि दरवाजात सचिन तेंडुलकर हसत उभा असतो.  थंगरासू नटराजनकडे पाहा. वय वर्षं 29. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपदार्पणाचं वय उलटलेलं. लग्नाच्या भाषेत सांगायचं तर प्रौढ कुमार. तरीही चार महिन्यांच्या आत त्याचं आयुष्य धडाधड बदलत गेलं. आधी त्यानं आयपीएल मोसम गाजवला. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याचं कौतुक झालं. २६ ऑक्टोबरला नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाच्या...

टेनिस

Australian Open 2021 : क्वारंटाईन महिला टेनिस स्टारचा Covid 19...

पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी  चार्टर्ड विमानाने आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिला टेनिस स्टारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्पेनची टेनिस खेळाडून  पाउला बेडोसा हिने रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या आघाडीच्या 72 खेळाडूंना मेलबर्न आणि अ‍ॅडलड अशा दोन वेगवगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 23 वर्षीय पाउला हिचा देखील यात समावेश आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.  IPL...

फुटबॉल

ISL 2021 : FC गोवा संघाने खानसाठी खेळले 'लोन' कार्ड

पणजी : बचावफळी आणि मध्यफळी मजबूत करण्याच्या उद्देशाने एफसी गोवा संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गोमंतकीय बचावपटू आदिल खान याला एफसी गोवा संघाने करारबद्ध केले. हैदराबाद एफसीकडून या 32 वर्षीय फुटबॉलपटूस ‘लोन’वर शुक्रवारी करारबद्ध करण्यात आले. आदिल भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे.  आदिलने स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे 2008 पासून व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीस सुरवात केली.   तो  कोलकात्यातील मोहन बागानतर्फेही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेच्या सुरवातीस...

बॅडमिंटन

Thailand Open : सायना हरली; श्रीकांतनं अर्ध्यातच सोडला सामना  

बँकॉक : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालची नव्या वर्षातील सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. पहिल्या फेरीत दिमाखदार विजय नोंदवणाऱ्या सायनाला गुरुवारी महिला एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटनमधील तिचा प्रवास संपुष्टात आला आहे. सायनाने पहला सेट जिंकून आगेकूच करण्याचे संकेत दिले. पण कामगिरीत सातत्य राखण्यात तिला अपयश आले. 68 मिनिटे रंगलेल्या सामन्यात  23-21,14-21,16-21 असा पराभव तिच्या पदरी पडला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 12 व्या स्थानावर...

लोकल स्पोर्ट्स

स्वाती-भाग्यश्रीसह 9 जणी राष्ट्रीय कुस्तीत दाखवणार महाराष्ट्राची ताकद

Womens National Wrestling Tournament : महिलांच्या विविध वजनी गटांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील महिला कुस्तीपटूंची निवड चाचणी रविवारी पार पडली. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कात्रज येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून राष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचणी घेण्यात आली. आशियाई स्पर्धेतील पदक विजेती कोल्हापूरची स्वाती शिंदे आणि अहमदनगरची आशियाई कुस्ती पदक विजेती भाग्यश्री फंड या दोघी महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत.  या स्पर्धेसाठी...

इतर स्पोर्ट्स

ऑलिम्पिक चॅम्पियन अमेरिकन महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई

ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये (हर्डल्स) सुवर्ण पदक मिळवणारी ब्रियाना मॅकनीलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अँटि-डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर बंदी घालण्यात आली. अ‍ॅथलेटिक्स इंटेग्रिट यूनिट  (एआययू) ने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली.  स्लेजिंगचा खेळ! खुन्नस देणं नडलं; श्रीसंतची मुंबईकरानं केली धुलाई (VIDEO) 29 वर्षीय मॅकनीलने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. 2013 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने बाजी मारली होती. 2017...

आयपीएल लिलाव 2021

IPL Mini auction 2021 : चेन्नईत पार पडणार मिनी लिलाव; तारीख ठरलीये...

IPL Mini auction  2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021 ) च्या 14 व्या हंगामापूर्वी  खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. फ्रेंचायझी संघाने खेळाडूंची रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केल्यानंतर काही खेळाड़ूंच्या अदलाबदलीची प्रक्रियाही सुरु आहे. या सर्व प्रक्रियेला वेग आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल स्पर्धेसाठीचा मिनी लिलाव पार पडणार असल्याची बोलले जात होते. आता यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2021: Mini auction to be held on February 18 or 19 in Chennai Read...