World Cup 2019 : 'चाहत्यांचे आभार; शेवटच्या श्वासापर्यंत मी संघासाठी लढत राहणार'

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

जडेजानं आपल्या ट्विटमध्ये, "कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानं शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार", असे त्याने म्हटले आहे.

मॅंचेस्टर : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात भारताला पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, या सामन्यात रवींद्र जडेजानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंर रविंद्र जडेजाने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. जडेजानं आपल्या ट्विटमध्ये, "कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानं शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार", असे त्याने म्हटले आहे.
 

दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांवर बाद झाला. पहिल्या 10 षटकांत भारतानं 4 विकेट गमावल्या, त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या बेजबाबदारपणे फटके मारून बाद झाले. मोक्याच्या क्षणी या दोन विकेट गेल्यानंतर आठव्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जडेजानं भारताचा डाव सावरला.

जडेजाने धोनीसोबत 100 धावांची अभेद्य भागिदारी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जडेजा 77 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजा वर्ल्ड कपमध्ये या क्रमांकावर दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कुल्टर नाइलने वेस्ट इंडिजविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती. भारताच्या पराभवानंतरही सोशल मीडियावर जडेजावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या