World Cup 2019 : आजही पाऊस आला तर भारत...

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे उद्या बुधवारवर ढकलला गेला आहे. आजही पावसामुळे खेळ वाया गेला तर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे उद्या बुधवारवर ढकलला गेला आहे. आजही पावसामुळे खेळ वाया गेला तर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सामना मंगळवारी पावसामुळे थांबविण्यात आला तेव्हा न्यूझीलंडने 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या होत्या. पावसाने विश्रांती घेतल्यावर सामना सुरू होण्याची लक्षणे होती. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने अखेरीस राखीव दिवसाची मदत घेण्यात आली. आता राखीव दिवशी मंगळवारी सामना थांबला त्या स्थितीतून पुढे खेळविला जाईल. मात्र, पावसाचा धोका उद्या देखील आहे. सामना पूर्ण 50 षटकांचा होण्यासाठी किमान साडेचार तासांचा पावसाचा ब्रेक आवश्‍यक आहे, तर ट्‌वेंटी-20 साठी दोन तास. या परिस्थितीत मॅंचेस्टरचे हवामान पाहिल्यास लढत सुरू होण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण असेल. पण, तासाभराने (भारतीय वेळेनुसार 4 वाजता) पाऊस होईल, असा ऍक्‍युवेदरचा अंदाज आहे. 

त्यानंतर किमान चार तास ढगाळ हवा असेल आणि पुन्हा एक तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता उद्या देखील सामना झाला नाही, तर साखळीतील सर्वाधिक गुणांच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.


​ ​

संबंधित बातम्या