... तर आयपीएल खेळू नका; कपिल देव यांचा टीम इंडियाला कानमंत्र!
आयपीएलचा तेरावा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिली लढत होणार असून हा थरार सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
नवी दिल्ली : यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ही टीम इंडियासाठीच नव्हे, तर देशभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडिया सतत क्रिकेट खेळत असल्याने त्याचा ताण खेळाडूंवर दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने अति-क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंवर ताण येत असल्याचे भाष्य केले होते. याची दखल घेत टीम इंडियाचे माजी विश्वविजेते कॅप्टन कपिल देव यांनी खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दिल्लीतील एका कार्यक्रमाप्रसंगी कपिल देव म्हणाले की, ''सतत क्रिकेट खेळून जर तुम्हाला ताण आला असेल आणि विश्रांती घ्यावी वाटत असेल, तर आयपीएल खेळू नका. आयपीएलमुळे खेळाडूंना संधी मिळते यात शंका नाही, मात्र, या स्पर्धेमध्ये खेळणं एवढं प्रतिष्ठेचंही नाही. कुणाचं वैयक्तिक नुकसान व्हावं अशी माझी इच्छा नाही. पण ज्यावेळी तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करता त्यावेळी आणि आयपीएलमध्ये खेळत असताना या दोन्ही वेळी स्वत:मध्ये खूप वेगवेगळ्या भावना येतात. देशासाठी खेळताना जी भावना येते ती क्लब क्रिकेट किंवा आयपीएल खेळताना येत नाही.''
- खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..
टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शनिवारपासून (ता.२९) दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होत आहे. त्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे मॅच खेळणार आहे. तसेच विराट कोहली, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहमंद शमी, कुलदीप यादव आणि रिषभ पंत हे बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन या टी-२० मॅचसाठी तिकडे जाणार आहेत.
- #IPL2020 : टाईमटेबल बदलल्याचा फायदा राजस्थान रॉयल्सला; दोन होम ग्राउंडचं गिफ्ट!
दरम्यान, आयपीएलचा तेरावा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिली लढत होणार असून हा थरार सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कपिल देव यांनी दिलेला सल्ला खेळाडू अमलात आणतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
- दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद?
Former India captain Kapil Dev: You (Indian cricket players) do not represent your country there (IPL). So if you think you are burned out, you can always take a break during the IPL. When you represent your country, it should be a different feeling. (27/02/2020) pic.twitter.com/8UITmvYlt2
— ANI (@ANI) February 28, 2020