लढवय्यी जलपरीला सलाम! ब्लड कॅन्सरला हरवून ऑलिम्पिंकसाठी झाली क्वालिफाय

Saturday, 10 April 2021

टोकियो अ‍ॅक्वाटिक्स सेंटर येथे 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जपान नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झालीये. जपानच्या रिकाको इकीने महिलांच्या 50 मीटर बटरफ्लाय फायनलमध्ये भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. रिकाको इकी हिला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला होता. 10 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंटमधील अंतर तिने 53.58 सेकंदात पार केले. 54 सेकंदाच्या आत अंतर पार केल्याचे समाधान वाटते, असे तिने म्हटले आहे. जपानमधील नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंटमध्ये विजय मिळेल, असे वाटले नव्हते.

टोकियो अ‍ॅक्वाटिक्स सेंटर येथे 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जपान नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झालीये. जपानच्या रिकाको इकीने महिलांच्या 50 मीटर बटरफ्लाय फायनलमध्ये भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. रिकाको इकी हिला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला होता. 10 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंटमधील अंतर तिने 53.58 सेकंदात पार केले. 54 सेकंदाच्या आत अंतर पार केल्याचे समाधान वाटते, असे तिने म्हटले आहे. जपानमधील नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंटमध्ये विजय मिळेल, असे वाटले नव्हते. त्यामुळेच विजय मिळाल्यावर तिला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.