World Cup 2019 : भारत घेणार न्यूझीलंडविरुद्ध 44 वर्षांपूर्वीचा बदला

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तब्बल 44 वर्षांनी ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे या सामन्याला वेगळेच महत्त्व आले आहे. तसेच वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तब्बल 44 वर्षांनी ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे या सामन्याला वेगळेच महत्त्व आले आहे. तसेच वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. 

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना 1975 मध्ये झाला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघ कधीच उपांत्य फेरीत लढलेला नाही. 1975मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला होता. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत या दोन्ही संघात सात सामने झाले आहेत. या सातपैकी भारताने तीन सामन्यांत विजय मिळवला आहे तर किवींनी चार.

भारतीय संघ गुणतक्त्यांत पहिल्या क्रमांकावर आहे तर न्यूझीलंड. या स्पर्धेत दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत.  


​ ​

संबंधित बातम्या