Aus vs Ind , 4th Test : अजिंक्य सेनेनं अभिमानाने मिरवला तिरंगा; पाहा ऐतिहासिक क्षणाचे खास फोटो

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

सिडनीतील कसोटी सामना हातून निसटतोय असे वाटत असताना जिगरबाज खेळीनं भारतीय संघाने सामना अनिर्णित राखला. आणि चौथा सामना जिंकून मालिका खिशात घातली. ऐतिहासिक मालिका विजयानंतरचे काही खास क्षण...        

Aus vs Ind , 4th Test ब्रिस्बेनच्या मैदानात रंगलेल्या निर्णायक कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांना आसमान दाखवत मैदानात अभिमाने तिरंगा मिरवला. भारतीय संघाला ज्यावेळी पहिल्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यावेळी संघ मालिका काय तर पुढचा एक सामनाही जिंकणार नाही असे बोलले गेले. मात्र या सर्व गोष्टी फोल ठरवत मेलबर्न कसोटीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने दिमाखात कमबॅक केले.

सिडनीतील कसोटी सामना हातून निसटतोय असे वाटत असताना जिगरबाज खेळीनं भारतीय संघाने सामना अनिर्णित राखला. आणि चौथा सामना जिंकून मालिका खिशात घातली. ऐतिहासिक मालिका विजयानंतरचे काही खास क्षण...        

Image

ब्रिस्बेनच्या मैदानात ऐतिहासिक विजय नोंदवत टीम इंडियाने चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरले. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मालिका विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा आनंद व्यक्त केला.

 

Image

सिराजने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाच गडी मिळवले. त्याच्या या कामगिरीला पंतने अर्धशतकी खेळीची जोड देत संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला. सिराज-पंतच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काही सांगून जात आहे.

Image

हा क्षण कायम लक्षात राहिल असाच आहे. पंतने 138 चेंडूत 89 धावा केल्या यात त्याने 9 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार खेचला. 

 

Image

भारतीय संघातील फलंदाजांनी कांगारु गोलंदाजांची अवस्था अगदी केविलवाणी केली होती.

Image

विकेटमागे स्ट्रगल करणाऱ्या पंतच सहकाऱ्यांनी मोठ्या मनानं कौतुक केलं. मयांक अगरवाल आणि कुलदीप यावद यांच्यातील एक क्षण

Image

ब्रिस्बेनच्या मैदानात मिळवलेल्या 2-1 अशा फरकाने  ऐतिहासिक मालिका विजयानंतर अजिंक्यच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा रुबाब

 


​ ​

संबंधित बातम्या