खिशात लाल रुमाल आणि शुभमनची स्टिकर नसलेल्या बॅटमागचे 'राज'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

शुभमन गिलच्या बॅटला स्टिकर नसल्यामुळे अनेकांना आश्चर्यही वाटले. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. एवढेच नाही तर त्याच्या खिशातील लाल रुमालही लक्षवेधी ठरला.

Australia vs India, 4th Test :  ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील निर्णायक सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात आला. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर शुभमन गिलने आपल्या दमदार खेळीनं सर्वांचे लक्ष्य वेधले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडी जेव्हा मैदानात आली तेव्हा शुभमन गिलच्या बॅटवर स्टिकर नसल्याचे दिसून आले. शुभमन गिलच्या बॅटला स्टिकर नसल्यामुळे अनेकांना आश्चर्यही वाटले. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. शुभमनची खेळी पाहून प्रभावित झालेल्या समालोचकांनीही असाच खेळत राहिला तर चांगल्या ब्रँडचे स्टिकर लवकरच शुभमनच्या बॅटला चिटकल्याचे दिसेल, असे भाष्यही केल्याचेही ऐकायला मिळाले. त्यानंतर आता यामागचे नेमके कारण समोर आले आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी त्याच्या बॅटला स्टिकर नसले तरी तो नेहमीच अशी बॅट वापरत नाही. स्टिकर निघून पडल्याने त्याने याच बॅटने खेळने पसंत केले. शुभमन गिल हा भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगच्या  'यू वी कॅन' या एनजीओचे स्टिकर असणारी बॅट वापरतो. ही संस्था कॅन्सरग्रस्तांची मदत करते. 

ब्रिस्बेनच्या मैदानात शुभमन गिलच्या खिशात दिसलेल्या लाल रुमालानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगाचा रुमालसोबत ठेवणे तो शुभ मानतो. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध शुभंमन गिलने शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने लाल रुमाल खास असल्याचे म्हटले होते.

एका मुलाखतीमध्ये शुभमन गिलने स्वत: लाल रुमाल बाळगण्यासंदर्भातील खुलासा केला होता. रुमाल कंमरेला अडकवून किंवा खिशात ठेवून मी सुरुवातीपासून खेळतो. पूर्वी मी पांढऱ्या रंगाचा रुमाल वापरायचो. 16 वर्षाखालील स्पर्धेत लाल रुमालसोबत असताना मी शतकी खेळी केली. तेव्हापासून मी लाल रुमाल बाळगतो, असे त्याने सांगितले होते. 


​ ​

संबंधित बातम्या