'अनफिट' पुकोवस्कीचा पार्टनरच बनला पेन टीमच्या वेदनेवरील 'मलम'
पुकोवस्कीला सिडनी कसोटीमध्ये क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. यातून तो सावरलेला नाही.
ब्रिस्बेनच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाप्रमाणे ऑस्ट्रेलियालाही मोठा धक्का बसला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला नव्या सलामी जोडीसह मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. सिडनी कसोटीत धमाकेदार पदार्पण करणाऱ्या विल पुकोवस्की हा दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या जागेवर नव्या गड्याला संधी देण्यात येणार आहे.
चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन (Tim Paine) ने युवा सलामीवीर चौथ्या कसोटीसाठी फिट नसल्याचे स्पष्ट केले. गाबामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात पुकोवस्कीऐवजी मार्कस हॅरिस (Marcus Harris) वॉर्नरसोबत संघाच्या डावाची सुरुवात करेल, असेही त्याने सांगितले आहे.
Syed Mushtaq Ali 2020 : अझरुद्दीनचा शतकी धमाका; 197 धावा करुनही मुंबई हरली (Video)
पुकोवस्कीला सिडनी कसोटीमध्ये क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. यातून तो सावरलेला नाही. त्याने बुधवारी सराव करण्याचा प्रयत्न केला. पण तो फिट दिसला नाही, असे पेनने म्हटले आहे. हॅरिसने देखील पुकोवस्कीप्रमाणेच शेफील्ड शील्ड सीजनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने विक्टोरियाकडून खेळताना 239 धावांची खेळी केली होती. पुकोवस्कीसोबत त्याने विक्रमी भागीदारीही रचली होती.