INDvsAUS : कांगारूंसमोर भारतीय शेर ढेर; ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका जिंकली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. आणि त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना देखील भारताला गमवावा लागला असून, ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिका आपल्या खिशात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का जायबंदी; मैदान सोडून जावे लागले हॉस्पिटलात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेट साठी 142 धावांची भागीदारी रचली. एरॉन फिंच 60 धावांचे योगदान देऊन माघारी फिरला. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावा केल्या. आणि त्यानंतर स्मिथने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवल्याचे आजच्या सामन्यात देखील पाहायला मिळाले. स्मिथने पहिल्या सामन्यात केलेली आक्रमक खेळी तशीच पुढे सुरु ठेवत 64 चेंडूत 104 धावा कुटल्या. व यानंतर लबूशेन व मॅक्सवेल यांनी अर्धशतकीय खेळी केली. मॅक्सवेलने आजच्या सामन्यात देखील भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने 29 चेंडूत 63 धावा फाटकावल्या. यामुळे आजच्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 389 धावा करत भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 390 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात पुन्हा खराब झाल्याचे पाहायला मिळाले. मयांक अग्रवाल व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर देखील सपेशल अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्रेयस अय्यर अवघ्या 38 धावा करून माघारी परतला. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पडझड रोखत भागीदारी केली. परंतु विराट कोहलीला जोश हेझलवूडने हेनरिक्स करवी झेलबाद केले. कोहली 89 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलला देखील ऍडम झम्पाने झेलबाद केले. कोहली आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा पॅट कमिन्सचे शिकार झाले. त्यामुळे भारतीय संघ 50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
AUSvsIND : हार्दिक पांड्यानं घेतला अंगलट येईल असा धाडसी निर्णय
भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या जोश हेझलवूड आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. ग्लेन मॅक्सवेल व हेनरिक्स या दोघांनी एक-एक विकेट्स घेतली.
Australia take the series 2-0 with one game to spare
Another game, another massive victory for the hosts!
A clinical performance with bat and ball from , as they win by 51 runs and go of the @cricketworldcup Super League table. pic.twitter.com/essK5L1R90
— ICC (@ICC) November 29, 2020
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 375 धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यात कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली होती. तर भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 5.40 च्या सरासरीने 54 धावा देऊन चार बळी घेतले. यानंतर जोश हेझलवूडने तीन बळी टिपले होते. व मिशेल स्टार्कने एक विकेट घेतली होती.