AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात कन्कशन सबस्टिट्यूटमुळे युजवेंद्र चहलला रवींद्र जडेजाच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. व  या संधीचे सोने करत युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात कन्कशन सबस्टिट्यूटमुळे युजवेंद्र चहलला रवींद्र जडेजाच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. व  या संधीचे सोने करत युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. चहलच्या या कामगिरीनंतर त्याला आज होत असलेल्या सिडनीतील दुसर्‍या टी -20 सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. मात्र आजच्या सामन्यात चहलच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगल्याच धावा केल्याचे पाहायला मिळाले. 

फिजिओ मैदानात का आले नाहीत :  मांजरेकर

तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे मालिका गमावण्याची भारतीय संघावर आली. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आणि पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने प्लेयिंग इलेव्हन मध्ये काही बदल केले होते. ज्यामध्ये युजवेंद्र चहलला वगळण्यात आले होते. मात्र पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी युजवेंद्र चहलने गोलंदाजी केली. व त्याचा फायदा भारतीय संघाला झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पहिल्या टी-ट्वेंटीत कामगिरीच्या जोरावर त्याला दुसर्‍या सामन्यात संधी मिळाली. पण या सामन्यात चहलच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत धावा केल्या आहेत. 

Record : 3 सामन्यांची T20 मालिका विराटने कधीच गमावलेली नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात गडी गमावत 194 धावा केल्या आहेत. यावेळेस चहलने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 12.80 च्या इकॉनॉमी रेटने 51 दिल्या. याशिवाय सर्वात जास्त धावा देऊन देखील चहलने आजच्या सामन्यात एक महत्वपूर्ण विकेट घेतली. त्याने फुलफॉर्म मध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथला 46 धावांवर हार्दिक पांड्या करवी झेलबाद केले. आणि या विकेट सोबतच युजवेंद्र चहल टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच त्याने या यादीत बुमराहसह प्रथम स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराहने यापूर्वी टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त 59 विकेट्स घेतले आहेत. त्यानंतर आता चहलने देखील 59 बळी टिपलेले आहेत. 

आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारे खेळाडू -

युजवेंद्र चहल - 59 विकेट

जसप्रीत बुमराह - 59 विकेट

आर अश्विन - 52 विकेट

भुवनेश्वर कुमार - 41 विकेट     

                 


​ ​

संबंधित बातम्या