तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदल; वाचा कोणला मिळाली बढती!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येणार आहे. आणि या आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल झाल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली आहे. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. आणि त्यामुळे उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दूल ठाकूर मैदानात उतरणार आहे.
सॉरी बेन स्टोक्स; आयसीसीचे ट्विट होतंय व्हायरल
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून टी नटराजनचा समावेश करण्यात आला होता. मात्र वरून चक्रवर्तीला देखील दुखापत झाल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत टी नटराजनला खेळवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियासोबतच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि टी-ट्वेन्टी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील मोहम्मद सिराज कडून चांगला खेळ केल्याचे पाहायला मिळाला होता. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला होत असलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात टी नटराजनला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
टी नटराजनसह शार्दुल ठाकूरला देखील ऑस्ट्रेलियासोबतच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात जागा मिळाली आहे. ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने तो उर्वरित सामन्यांसाठी मैदानावर अनुपस्थित राहणार आहे. आणि आता त्याच्या जागेवर शार्दूल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेटमधील ‘दादा’ राजकीय मैदानात?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागले होते. सामन्यानंतर घेण्यात आलेल्या स्कॅनवरून उमेश यादव मालिकेच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये खेळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याच्या जागी मोहम्मद सिराज तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात खेळताना दिसेल.
NEWS: T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad. #TeamIndia #AUSvIND
Details https://t.co/JeZLOQaER3 pic.twitter.com/G9oXK5MQUE
— BCCI (@BCCI) January 1, 2021