AUSvsIND 1st Test Day 1:अर्धशतक हुकलेल्या चेतेश्वर पुजाराच्या नावावर झाला अनोखा विक्रम  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सामना आज अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सामना आज अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु यानंतर संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाचे सलामीवीर झटपट बाद झाल्याचे आज पाहायला मिळाले. मागील काही सामान्यांपासून धावा करण्यात अपयशी ठरत असलेला पृथ्वी शॉ आज देखील फ्लॉप झाला. त्याला मिचेल स्टार्कने अवघ्या शून्य धावावर बाद केले. त्यानंतर मयांक अग्रवालला पॅट कमिन्सने आऊट केले. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहली सोबत भागीदारी करत डावाला सावरले. परंतु अर्धशतकासाठी सात धावा कमी असताना चेतेश्वर पुजाराला नॅथन लियॉनने लबूशेन करवी झेलबाद केले. 

AUS vs IND, 1st Test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया बॅकफूटवर!

चेतेश्वर पुजाराने आज फलंदाजी करताना 160 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या. ही खेळी करतानाच चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे. व यात त्याने इंग्लंड संघाचा फलंदाज जो रूटला मागे टाकले आहे. चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात अधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला आहे. 

AUSvsIND 1st Test Day 1 : विराट खेळी बहरता बहरता गडबडली!

अ‍ॅडिलेड कसोटीतील पहिल्या दिवशी पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने फलंदाजी करताना 160 चेंडूंचा सामना केला. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत 3609 चेंडूंचा करणारा फलंदाज ठरला आहे. तसेच यात त्याने इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकले आहे.  इंग्लंडचा कर्णधार असलेल्या रूटने ऑस्ट्रेलियाच्या 3607 चेंडूंचा सामना केलेला आहे. यानंतर तिसर्‍या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 3183 चेंडूंचा सामना केला आहे. आणि चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी सलामीवीर अ‍ॅलिस्टर कुक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 3122 चेंडूंचा सामना केलेला आहे. 

कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे फलंदाज - 
चेतेश्वर पुजारा -  3609
जो रूट -  3607
विराट कोहली - 3183 
अ‍ॅलिस्टर कुक - 3122 
       


​ ​

संबंधित बातम्या