AUSvsIND : सिडनी कसोटीवर पुन्हा कोरोनाचे संकट 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 1 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे काळे ढग तयार झाले आहेत. कारण सिडनीत गुरुवारी कोरोना विषाणूचे दहा संक्रमित रुग्ण आढळले आहेत. आणि त्यामुळे मागील दोन आठवड्यांमध्ये सिडनीतील कोरोना बाधित प्रकरणांची संख्या 170 वर पोहचली आहे. तर नवीन वर्षातील सात जानेवारीला सिडनी येथील एमसीजीच्या मैदानावर तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. 

सॉरी बेन स्टोक्स; आयसीसीचे ट्विट होतंय व्हायरल  

ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या उत्तर भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने तिसरा कसोटी सामना ठरलेल्या नियोजनानुसार सिडनीतच खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. ब्लु माऊंटन, इलावर या भागात कोरोनाची प्रकरणे आढळून येत होती. मात्र त्यानंतर आता बेराला व स्मिथफील्ड या भागात स्थनिक प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. व हे भाग एमसीजी ग्राउंडपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे आगामी कसोटीवर पुन्हा संकटाचे ढग दाटून आले आहेत. 

त्यानंतर संबंधित अहवालामध्ये आगामी कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये परवानगी देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे म्हटले आहे. किंवा दर्शकांसाठी मास्क बंधनकारक करण्याचा देखील उपाय असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रॉडकास्टींग स्टाफ मधील उपस्थितांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

क्रिकेटमधील ‘दादा’ राजकीय मैदानात?

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान  खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.
 


​ ​

संबंधित बातम्या