AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारणे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. कोरोनाच्या संकटानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. आणि या सामन्यात भारताला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला असून, ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मायदेशी परतला, तेव्हाच रोहितचा दौरा हुकला?
1. ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाची सुरवातीची फळी मोडण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिंच (114) यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावा जोडल्या. व त्यानंतर डेव्हिड वॉर्नर 69 धावांवर बाद झाला. वॉर्नरनंतर आलेल्या स्मिथने (105) देखील दमदार कामगिरी केली. व दुसऱ्या विकेट साठी या दोघांनी मिळून 108 धावा जमवल्या. व त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आल्याचे पाहायला मिळाले.
2. ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. मात्र या भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या धावफलकाला लगाम लावता आला नाही. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 50 षटकात सहा गडी गमावून 374 धावांचा डोंगर उभारला.
3. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 375 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात म्हणावी तशी झाली नाही. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 53 धावा केल्या. मात्र त्यानंतर मयांक अग्रवाल जोश हेझलवूडचा शिकार ठरला. त्याने 18 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली एक धावांवर असताना ऍडम झम्पाने सोडलेल्या झेलचा फायदा विराटला करता आला नाही. विराट कोहलीला देखील जोश हेझलवूडने फिंच करवी झेलबाद केले. त्यावेळी भारताची धावसंख्या 78 होती. तर श्रेयस अय्यर देखील अवघ्या दोन धावांवर माघारी परतला. त्याला सुद्धा हेझलवूडने बाद केले. तर केएल राहुलला ऍडम झम्पाने फक्त १२ धावांवर माघारी धाडले.
AUSvsIND थट्टामस्करी चालेल, शिवीगाळ नकोच
4. भारताच्या सुरवातीच्या फळीला जोश हेझलवूड आणि ऍडम झम्पाने सुरुंग लावला. त्यामुळे भारताची स्थिती 101 धावांवर चार विकेट्स अशी झाली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. परंतु शिखर धवन 79 धावांवर बाद झाला. पण हार्दिकने जबाबदारीने आपला खेळ सुरु ठेवला होता.
5. शिखर धवनच्या जाण्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी पुन्हा भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हार्दिक पांड्याला ऍडम झम्पाने स्टार्क करवी झेलबाद केले. तो 90 धावांवर बाद झाला. व त्यापाठोपाठ रवींद्र जडेजाला देखील ऍडम झम्पाने 25 धावांवर चालते केले.
Australia finish on a mammoth 374/6
Aaron Finch 114
Steve Smith 105What a performance from the hosts!
Follow #AUSvIND https://t.co/CJnCSbUTV6 pic.twitter.com/NGNLSb9r3c
— ICC (@ICC) November 27, 2020
Australia get their first breakthrough
Josh Hazlewood gets Mayank Agarwal and India are 53/1.
Follow #AUSvIND https://t.co/CJnCSbUTV6 pic.twitter.com/gNeqeUaa2i
— ICC (@ICC) November 27, 2020
Virat Kohli dropped on 1 by Adam Zampa... How costly is that going to be?
Follow #AUSvIND https://t.co/CJnCSbUTV6 pic.twitter.com/GoE5JZAThv
— ICC (@ICC) November 27, 2020
Adam Zampa has broken the 128-run stand between Dhawan and Pandya
India still need 146 more to win!
Advantage Australia?
Follow LIVE https://t.co/CJnCSbUTV6 pic.twitter.com/4po2JaBd7G
— ICC (@ICC) November 27, 2020
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 29 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.