AUSvsIND 2 ODI : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत (फोटो)

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि या परभवाबरोबरच भारताला मालिका देखील गमावण्याची नामुष्की ओढवली. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वॉर्नर, फिंच, लबशेन व मॅक्सवेल यांच्या अर्धशतकीय आणि स्मिथ याने  केलेल्या शतकीय खेळीमुळे भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ  50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2-0 ने वर्चस्व राखले आहे. 

प्रेमाच्या डावाला ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅक्सवेलची अशीही दाद  

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिंच या दोघांनी मिळून पहिल्या विकेट साठी 142  धावांच्या भागीदारीची नोंद केली. डेव्हिड वॉर्नरने 83, फिंचने 60 धावा केल्या. 

ऍरॉन फिंच बाद झाल्यावर आलेल्या स्मिथने देखील आजच्या सामन्यात दमदार खेळी केली. स्मिथने 64 चेंडूत 104 धावा कुटल्या. या दरम्यान स्टीव्ह स्मिथने 14 चौकार आणि 2 जबरदस्त षटकार लगावले.

त्यानंतर लबूशेन व मॅक्सवेल यांनी अर्धशतकीय खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा धावफलक अधिक वेगाने धावा करत चालूच ठेवला. ग्लेन मॅक्सवेल मॅक्सवेलने 29 चेंडूत 63 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 390 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 58 धावा केल्या. 

मयांक आणि शिखर धवन बाद झाल्यावर क्रिझवर आलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने आजच्या डावात 78 धावा पूर्ण केल्या त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  22000 धावा पूर्ण केल्या. आजच्या सामन्यात विराट कोहलीने 89 धावांची खेळी केली. विराटने 87 चेंडूंचा सामना करताना  सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.  

विराट आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलने 66 चेंडूत 76 धावा केल्या. केएल राहुलला ऍडम झम्पाने हेझलवूड करवी झेलबाद केले. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 2 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या