भारतीय संघाला 2016 ची पुनरावृत्ती करण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामना आज सिडनीत खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामना आज सिडनीत खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरऑस्ट्रेलियाच्या संघाने मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात पाच गडी गमावत 186 धावा केलेल्या आहेत.

हार्दिक पांड्या हा धोनी आणि युवराज सिंग सारखा फलंदाज 

ऑस्ट्रेलियाची सुरवात आज अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या सुंदरने आपल्या पहिल्याच षटकात फुलफॉर्म मध्ये असलेल्या ऍरॉन फिंचला शून्य धावांवर माघारी धाडले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला देखील सुंदरने 24 धावांवर बाद करत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर मॅक्सवेल आणि वेड यांनी संघाला सावरत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. वेडने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक केले. वेड 80 धावा करून बाद झाला. त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. याशिवाय, मॅक्सवेलने 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. त्याला टी नटराजनने बाद केले. तर शॉर्ट सात धावांवर धावबाद झाला.

दरम्यान, भारताकडून सुंदरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर टी नटराजन आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्‍वास अधिक बळकट करण्यासाठी आजचा तिसरा आणि अखेरचा ट्‌वेन्टी-20 सामना जिंकून कांगारूंना त्याच्याच देशात व्हॉईटवॉशची संधी आहे. शिवाय 2016 ची पुनरावृत्ती करण्याचीही भारताला संधी आहे. 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने ट्‌वेन्टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. तो इतिहास उद्या पुन्हा घडण्याची शक्‍यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या