AUSvsIND 3rd Test D1: पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत   

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्ययामुळे पहिल्या दिवशीचा खेळ 55 ओव्हर्सच होऊ शकला. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 55 ओव्हर्स मध्ये 2 गडी गमावून 166 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशीच मजबूत स्थितीत पोहचला आहे. 

AusvsInd "क्रिकेटच्या प्रेमात कोरोनाच्या जाळ्यात अडकायचे नाही"

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्यामुळे खेळ सुरु करण्यास उशीर झाला. पावसामुळे खेळ चालू होऊ न शकल्यामुळे लंच ब्रेक काही वेळ आधी घेण्यात आला. मात्र त्यानंतर देखील पावसाच्या आडकाठीमुळे खेळ सुरु होण्यासाठी विलंब लागला. यानंतर अंपायर यांनी मैदानाचे निरीक्षण केल्यानंतर सामन्यास सुरवात झाली. 

तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाला फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पहिला धक्का बसला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला अवघ्या पाच धावांवर चेतेश्वर पुजारा करवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर सलामीवीर विल पुकोव्हस्की आणि लबूशेन यांनी कांगारूंचा डाव सावरला. या दोघांनीही दुसऱ्या विकेट साठी शतकीय भागीदारी रचली. पुकोव्हस्कीने अर्धशतकीय खेळी केल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या नवदीप सैनीने पायचीत केले. 

अन् 'MS धोनी द अनटोल्ड स्टोरी'तला किस्सा केनसोबत प्रत्यक्षात घडला (...

पुकोव्हस्कीने 110 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. त्यानंतर विल पुकोव्हस्की बाद झाला. त्यानंतर पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत कांगारूंनी 166 धावा केल्या आहेत. सध्या लबूशेन अर्धशतकासह मैदानावर टिकून आहे. आणि त्याच्यासोबत पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला स्टिव्ह स्मिथ 31 धावांवर खेळत आहे. लबूशेनने 149 चेंडूंचा सामना करताना आठ चौकारांसह 67 धावा केलेल्या आहेत.     

        


​ ​

संबंधित बातम्या