''हिटमॅनला बाद केल्यामुळे सोडला सुटकेचा निश्वास''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पाचवा आणि शेवटचा दिवस उद्या आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने सध्यातरी या सामन्यात बढत मिळवल्याचे चित्र आहे. मात्र भारतीय संघाने शेवटच्या दिवशी चांगली खेळी केल्यास पुन्हा सामन्याची बाजू झुकण्याची शक्यता आहे. मात्र चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
AusvsInd Brisbane Test News : ट्विस्ट संपले; चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्येच!
ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 312 धावा केल्या. आणि त्यानंतर कांगारूंनी आपला डाव घोषित केला. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 407 धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात दुसऱ्या डावात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार ओपनिंग केल्याचे पाहायला मिळाले. मात्र संघाची धावसंख्या 71 असताना शुभमन गिल बाद झाला. तर अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्माला 52 धावांवर पॅट कमिन्सने मिचेल स्टार्क करवी झेलबाद केले. त्यामुळे रोहित शर्माला दुसऱ्या डावात सूर गवसला असता तरी त्याला संघाला दबावातून बाहेर काढता आले नाही. चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मैदानात खेळत आहेत. परंतु खेळ झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांनी सुटकेचा निश्वास सोडला असल्याचे म्हटले आहे.
AUSvsIND : वर्णभेदी टिप्पणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा
जस्टिन लँगर यांनी सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना, टीम इंडीयाचा सलामीवीर रोहित शर्माला बाद केल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असल्याचे म्हटले आहे. रोहित शर्मा एक दमदार खेळाडू आहे. आणि त्याला बाद करता आले नसते तर त्याने गतीने धावा करत सामन्याचे चित्रच पालटले असते, असे जस्टिन लँगर यावेळेस म्हणाले. याशिवाय सिडनीतील पाटासारख्या क्रिझवर रोहित शर्माची धावसंख्या पाहायला गेली तर ती खूप मोठी आहे. आणि आज ज्या धावसंख्येवर तो बाद झाला ती धावसंख्या खूपच लहान असल्यामुळे, त्याला लवकरात लवकर बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठी संधी असल्याचे मत जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले.
Huge moment! The Aussies get a major breakthrough right before stumps.#AUSvIND | @hcltech pic.twitter.com/6Zww1W383l
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021
दरम्यान, दुखापतीनंतर तिसऱ्या सामन्यातून पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्माने पहिल्या डावात 77 चेंडूंचा सामना करताना 26 धावा केल्या होत्या. यावेळी त्याला जोश हेझलवूडने बाद केले होते. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना, हिटमॅनने 98 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि पाच चौकार यांच्या मदतीने 52 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात विजयासाठी भारताला अजून 309 धावा कराव्या लागणार असून, टीम इंडियाकडे आठ विकेट्स आणि पूर्ण एक दिवस शिल्लक आहे.