''टीम इंडियाच्या विकेटकिपिंग साठी संगीत खुर्ची''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघातील पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मेलबर्न येथे खेळल्या जाणार्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन नव्या चेहर्यांना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. आणि पहिल्या सामन्याचा विचार केल्यास उद्या पासून होत असलेल्या दुसऱ्या सामन्यासाठी टिम इंडियात चार बदल झालेले आहेत.
अजिंक्य शांत स्वभावाचा, पण...; वाचा मास्टर ब्लास्टर काय म्हणाला
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला असल्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात संघात अनुपस्थित राहणार आहे. याशिवाय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो देखील मालिकेबाहेर पडला आहे. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी प्लेयिंग इलेव्हन मध्ये शुभमन गिलला संधी देण्यात आलेली आहे. तर मोहम्मद शमीच्या जागी टी-ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरीजला पदर्पणाची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, वृद्धिमान साहाच्या जागेवर रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले असून, विराट कोहलीच्या जागी रवींद्र जडेजाचे संघात आगमन झाले आहे. तर, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह हे संघात कायम असणार आहेत.
ALERT: #TeamIndia for 2nd Test of the Border-Gavaskar Trophy against Australia to be played in MCG from tomorrow announced. #AUSvIND pic.twitter.com/4g1q3DJmm7
— BCCI (@BCCI) December 25, 2020
टीम इंडियाच्या या निवडीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. संजय मांजरेकर यांनी संघाच्या निवडीवर बोलताना, दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची निवड दबावाखाली झाली असल्याचे म्हटले आहे. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विट करताना, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड दडपणाखाली झाली असल्याचे लिहिले आहे. त्याशिवाय इंग्लंड प्रमाणेच भारतीय संघात देखील सर्व काही कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मोठे वक्तव्य संजय मांजरेकर यांनी आपल्या या ट्विट मध्ये केलेले आहे. तसेच आता संघावर ऍक्शन दाखवण्याची वेळ आहे, असे त्यांनी पुढे लिहिले आहे.
संजय मांजरेकर यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने देखील संघ निवडीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जागी रवींद्र जडेजाची निवड झाल्याबद्दल आकाश चोप्राने आश्चर्य वाटल्याचे ट्विटर वर म्हटले आहे. याशिवाय समालोचक हर्षा भोगले यांनी एकाच सामन्याच्या निकालानंतर वृद्धिमान साहाला वगळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. व त्यामुळे संघातील विकेटकिपर साठी संगीत खुर्ची चालू असल्याची टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली.
Indian team for second Test is clearly an ‘under pressure’ selection. A bit like England, trying to cover all bases. Selection done, it’s execution time now...Good luck India! #BoxingDayTest on @SonySportsIndia
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) December 25, 2020
Shubman to open along with Mayank...who made his Test debut at the same venue in 2018. Siraj making his debut too. India hasn’t added another batsman for Kohli...instead Jadeja gets a game. Five bowlers including two spinners. Pant plays in place of Saha. 4 changes. #AusvInd
— Aakash Chopra (@cricketaakash) December 25, 2020
Thread. India's team for the 2nd test is an admission that they got many things wrong in the first test. Especially with the keeper & opener. They must think Shaw is short on confidence because dropping a player after 2 innings means you aren't giving him time to learn (cont)
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 25, 2020