AUSvsIND T20 : लक्षणीय कामगिरी करत रवींद्र जडेजाने मोडला धोनीचा रेकॉर्ड
एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी20 सामना खेळवण्यात आला.
एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवला आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने आजच्या देखील लक्षणीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. रवींद्र जडेजाने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.
भर मैदानात प्रपोज करणाऱ्या 'दीपेन'ने सांगितली लव्ह स्टोरी
ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारतीय संघाची सुरवात फारशी चांगली झाली नव्हती. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा मिचेल स्टार्कचा बळी ठरला. धवन केवळ एक धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांची भागीदारी होत असतानाच कोहली स्विप्सनचा शिकार झाला. कोहलीला स्विप्सनने अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ संजू सॅमसनच्या रूपात भारताची तिसरी विकेट पडली. संजू सॅमसनने 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याला हेनरिक्सने स्विप्सन करवी झेलबाद केले.
शिवाय मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या देखील लवकर बाद झाले. त्यामुळे 92 धावांवर अर्धा भारतीय संघ तंबूत परतला होता. आणि 17 व्या षटकापर्यंत भारताने केवळ 114 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजाने वेगवान धावा केल्या. आणि त्यामुळे भारताचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करू शकला.
Ravindra Jadeja's 23-ball 44*, featuring five fours and a six, has powered India to 161/7
What are your predictions for the second innings?
FOLLOW #AUSvIND https://t.co/FpDYCXHojX pic.twitter.com/GLPPFR1pkv
— ICC (@ICC) December 4, 2020
रवींद्र जडेजाने फलंदाजी करताना 23 चेंडूंचा सामना करत नाबाद 44 धावा लगावला. या दरम्यान रवींद्र जडेजाने पाच चौकार आणि षटकार खेचला. याशिवाय जोश हेझलवूडच्या 19 व्या षटकात त्याने तीन चौकार आणि एक षटकार खेचून 23 धावा गोळा केल्या. तसेच त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मागे टाकला आहे. रवींद्र जडेजाने सातव्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीने 2012 यामध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना 38 धावा केल्या होत्या.