AUSvsIND : जाणून घ्या कोणते नवे रेकॉर्डस् होऊ शकतात उद्याच्या सामन्यात 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला डे नाईट सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला डे नाईट सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे एका बाजूला आजपर्यंत एकाही डे नाईट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. तर भारताने यापूर्वी फक्त एकच डे नाईट सामना खेळलेला असून, या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलेला आहे. तसेच या मालिकेपूर्वी घेण्यात आलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला चांगलीच टक्कर दिली होती. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्यात कांगारूंना टीम इंडिया जोरदार आव्हान देणार आहे हे निश्चित. याशिवाय या सामन्यात काही नवे रेकॉर्डस् देखील होण्याची संभावना आहे. 

''विराट कोहलीसाठी बऱ्याच योजना आखल्या आहेत'' 

कसोटी क्रिकेटच्या प्रकारात चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 77 सामन्यात 5,840 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरु होत असलेल्या या सामन्यात चेतेश्वर पुजाराने 160 धावा केल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा पार करू शकतो. व हा विक्रम त्याने गाठल्यास भारताकडून कसोटीत 6000 धावा पूर्ण  करणारा तो 11 वा फलंदाज बनेल.  

त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यानंतर पुन्हा पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतणार आहे. विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना आतापर्यंत 41 शतक लगावले आहेत. आणि आता अजून एक शतक कोहलीने झळकावल्यास तो याबाबतीत रिकी पॉन्टिंगच्या पुढे जाईल. कारण रिकी पॉन्टिंग देखील कर्णधार असताना 41 शतक केले होते. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात विराटने शतक केल्यास तो रिकी पॉन्टिंगच्या पुढे जाईल. तसेच 324 सामने खेळल्यानंतर रिकी पॉन्टिंगने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. तर विराट कोहली फक्त 188 व्या सामन्यात शतक करून हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. 

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉर्डने केवळ 50 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत 66 बळी घेतलेले आहेत. तर त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 49 विकेट्स घेतलेले आहेत. यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने एक किंवा त्याहून जास्त बळी मिळवल्यास त्याचा देखील या यादीत समावेश होईल. तसेच नॅथन लिऑनने 47 विकेट्स घेतलेले आहेत. त्यामुळे तो देखील हा कारनामा करू शकतो. 

AUSvsIND : पिंक बॉल सामन्यासाठी विराट सेनेची घोषणा 

तसेच, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज नॅथन लिऑनने आतापर्यंत कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 390 बळी घेतलेले आहेत. जर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला तर 400 कसोटी बळी त्याच्या नावावर होतील. आणि असा विक्रम करणारा लिऑन जगातील सहावा फिरकीपटू होईल. 


​ ​

संबंधित बातम्या