''विराट कोहली ज्याप्रकारे बाद झाला ते निराशाजनक''
अॅडिलेड येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका आज डे नाईट सामन्यापासून अॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरु झाली. अॅडिलेड येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ गुलाबी चेंडूने पहिल्यांदाच आमने-सामने आले आहेत. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने सगळ्याच कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याचे सुचविले आहे. तसेच आज विराट कोहली ज्याप्रकारे बाद झाला ते निराशाजनक असल्याचे शेन वॉर्नने म्हटले.
विराट बाबत योगायोग; तब्बल 8 वर्षानंतर, त्याच मैदानावर, त्याच टीम विरुद्ध... (...
कसोटी क्रिकेट मध्ये वापरण्यात येणारा लाल चेंडू हा गोलंदाजांसाठी मदतशीर ठरत नाही. आणि त्यामुळे सर्वच कसोटी सामन्यांमध्ये लाल चेंडूऐवजी चेंडू गुलाबी चेंडू वापरण्याचा सल्ला शेन वॉर्नने दिला आहे. डे नाईट कसोटी सामने सुरु झाल्यापासून यात लाल चेंडू ऐवजी गुलाबी चेंडू वापरण्यात येत आहे. मात्र आपण पहिल्या पासून सर्वच म्हणजे दिवसा खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात देखील गुलाबी चेंडूच वापरण्याविषयी बोलत असल्याचे शेन वॉर्नने म्हटले आहे.
तसेच गुलाबी चेंडू डोळ्यांना लगेच दिसू शकतो. प्रेक्षकांना देखील तो व्यवस्थित दिसतो. त्यामुळे दिवसाच्या कसोटीत देखील गुलाबी चेंडू वापरण्यास काहीच हरकत नसल्याचे शेन वॉर्नने सांगितले. याशिवाय साठ षटकानंतर गुलाबी चेंडू नरम पडत असल्याने तो बदलता येणे देखील शक्य असल्याचे मत शेन वॉर्नने व्यक्त केले. याव्यतिरिक्त लाल चेंडू अधिक स्विंग होत नसल्यामुळे त्याचा गोलंदाजाला कोणताच फायदा होत नाही. आणि लाल चेंडू 25 षटकांनंतरच नरम पडतो. त्यामुळे गुलाबी चेंडू अधिक योग्य असल्याने तोच वापरण्याचे शेन वॉर्नने सुचविले आहे.
पॅटर्निटी लिव्हबाबत दादा विराटच्या पाठीशी
तसेच, शेन वॉर्नने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाल्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी निराशा पदरी आल्याचे म्हटले आहे. चार कसोटी सामन्यांपैकी विराट कोहली एकच सामना खेळणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. व अर्धशतकीय खेळीनंतर तो लयीत देखील आला होता. मात्र त्यानंतर ज्याप्रमाणे तो धावबाद झाला ते निराशाजनक होते, असे शेन वॉर्नने सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर म्हटले आहे.
दरम्यान, विराट कोहली फलंदाजी करत असताना त्याच्या सोबत अजिंक्य रहाणे मैदानात होता. आणि यावेळेस स्ट्राईकवर असलेल्या अजिंक्यने ऑफ फिल्डरकडे ड्राईव्ह मारत एकेरी धाव घेण्यासाठी काही पावले पुढे आला. व अजिंक्य रहाणे कडे पाहून विराट कोहली देखील धाव घेण्यासाठी पळाला. विराट क्रिझच्या मध्यापर्यंत पोहचला असताना अजिंक्य रहाणेने धाव घेण्यास नकार दिला. मात्र तोपर्यंत चेंडू हेझलवूडने अडवून त्याने थ्रो लियॉनकडे सोपवला. व लियॉनने क्षणाचाही विलंब न करता विराट कोहलीला धावबाद केले. विराट कोहलीने बाद होण्यापूर्वी 180 चेंडूंचा सामना करत आठ चौकारांसह 74 धावा केल्या.
Critical moment in the series? pic.twitter.com/fhuvIzfBSC
— ICC (@ICC) December 17, 2020