AUSvsIND 2 T20 : शिखर धवनचा विक्रम; सुरेश रैनाला टाकले मागे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. आणि या विजयासोबतच भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा बदला घेत टी-ट्वेंटी मालिका आपल्या खिशात घातली. आज सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 195 धावांचे लक्ष्य भारताला दिले होते. आणि भारताने हे लक्ष्य चार गडी गमावत दोन चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले.
AUSvsIND कांगारुंचा वचपा काढला; पांड्याच्या षटकाराने भारताचा 'विराट'...
ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवनने आजच्या सामन्यात धमाकेदार अर्धशतक नोंदवले. भारताच्या डावाची सुरवात शिखर धवन आणि केएल राहुल या दोघांनी करत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची मजबूत भागीदारी केली. यानंतर केएल राहुलला 30 धावांवर अँड्रयू टायने बाद केले. मात्र शिखर धवनने खिंड लढवत आपले अर्धशतक नोंदवले. केएल राहुल माघारी परतल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसोबत 39 धावांची भागीदारी रचली. परंतु त्याला 52 धावांवर असताना अॅडम झम्पाने स्वीप्सन करवी झेलबाद केले.
AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम
शिखर धवनने आजच्या सामन्यात 36 चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि दोन चौकार खेचले. यावेळेस त्याचा स्ट्राईक रेट 144.44 चा होता. आणि या खेळीसह शिखर धवनने नवीन विक्रम रचला आहे. शिखर धवन टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावखुरा भारतीय फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. व या विक्रमासह त्याने भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकले आहे. सुरेश रैनाने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1605 धावा केलेल्या आहेत. तर डावखुरा फलंदाज असलेल्या शिखर धवनच्या आता 1641 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे शिखर धवनने याबाबतीत सुरेश रैनाला मागे टाकले आहे. यासह युवराज सिंग तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये 1177 धावा केलेल्या आहेत.
11th T20I half-century for Shikhar Dhawan
This is his second fifty-plus score in his last three T20Is #AUSvIND pic.twitter.com/oJppzl4Ube
— ICC (@ICC) December 6, 2020
सर्वात अधिक धावा करणारे डावखुरे फलंदाज -
शिखर धवन - 1641 धावा
सुरेश रैना - 1605 धावा
युवराज सिंग - 1177 धावा
गौतम गंभीर - 932 धावा